कोरोना विषाणू - Covid 19जळगाव जिल्हापाचोरा तालुकापूणे जिल्हा

जळगाव: पाचोरा येथे सुरक्षीततेची उपाययोजना खबरदारी म्‍हणून ५० बेडचे Covid19 केअर सेंटर कार्यान्‍वीत

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― संपुर्ण राज्‍यात कोरोना विषाणूची साथ झपाटयाने पसरत असून तातडीची उपाययोजना म्‍हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, नगरपालिका, विघ्‍नहर्ता हॉस्‍पीटल, ग्रामीण रुग्‍णालय पाचोरा यांचेतर्फे संयुक्‍तीत रित्‍या पाचोरा शहरातील विघ्‍नहर्ता हॉस्‍पीटल अधिग्रहीत करुन येथे रुग्‍णांकरीता ५० बेडस् चे कोव्‍हीड १९ केअर सेंटर कार्यान्‍वीत करण्‍यात आलेले आहे.
सुसज्‍ज अशा कोव्‍हीड १९ केअर सेंटरमध्‍ये प्रामुख्‍याने ५० बेडस्, पिण्‍याचे शुध्‍द पाणी, शौचालय, सॅनीटायझर, हात धुण्‍यासाठी साबण, मास्‍क, ऑक्‍सीजनची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली असून सदर ठिकाणी सोडीयम हायपोक्‍लोराईड ने फवारणी करुन कोव्‍हीड सेंटर परिसर पुर्णपणे निर्जुंतूक करण्‍यात आलेला आहे. पुढील काळात विषाणूंचा धोका निर्माण झाल्‍यास त्‍याच प्रतिबंध म्‍हणून तालुका प्रशासन व नगरपालिकेकडेस सर्व महत्‍वपुर्ण उपाययोजना करण्‍यात आलेल्‍या येत आहेत. अधिक गरज पडल्‍यास शहरातील इतर प्रमुख मंगल कार्यालये, लॉन्‍स यांना देखील अधिग्रहीत करण्‍यात येईल असे प्रशासनाकडून कळविण्‍यात आले आहे.
या वेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकिय अधिकारी समाधान वाघ, मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, विघ्‍नहर्ता हॉस्‍पीटलचे संचालक डॉ.भुषण मगर, कर निरीक्षक दगडू मराठे आदी उपस्थित होते.

Back to top button