ऊसतोड कामगारकोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाबीड तालुकाब्रेकिंग न्युजविशेष बातमी

#Lockdown ३ वर्षाच्या नाती पासुन आजोबा पळ काढतात ,नातेवाईक लांबुनच नाकं मुरडतात ,शासकीय अधिकारी व कर्मचारी फिरकलेच नाहीत– डॉ गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―साखर कारखान्यावरुन गावी परतलेल्या ऊसतोड मजुरांना केवळ ट्रक मधून उतरताना गावाबाहेर राहायचे एवढंच सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडून सांगितले जाते जिल्हाधिकारी बीड यांनी दिलेल्या कामाचा त्यांना विसर पडला असुन नंतर ते ऊसतोड मजुरांच्या झोपडीकडे फिरकत नाहीत,मात्र कागदोपत्री जिल्हा प्रशासनाला सर्व काही ठीक आहे असे सांगून फसवणूक करत आहेत, तर दुसरीकडं माणसातील माणूसपण या आजाराने हरवत चालल्याची खंत ऊसतोड मजुरांनी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याशी बोलताना व्यक्त केली.

सविस्तर वृत्त असे की, बीड तालुक्यातील मौजे बेलगाव येथिल ४५ ऊसतोड मजूर गावी परतले असुन सरपंच , ग्रामसेवक, तलाठी यांनी ट्रकमधून उतरताना केवळ गावाच्या बाहेर राहायचे एवढंच सांगितले नंतर ३ दिवसात कोणीही इकडं फिरकले नाही.

माणुसकी हरवत चालली – बाळु जोगदंड

माझी ३ वर्षाची शिवाणी मुलगी असून माझे वडील प्रभु जोगदंड आम्हाला भेटायला रानात येतात परंतु माझी मूलगी त्यांच्या जवळ चालली की ते पळुन गावात जातात.आमच्या ३-४ वेळा तपासण्या झाल्या आहेत, गावातील नातेवाईक ,लोकांच्या एकदाही तपासणी झाली नाही तरीसुध्दा तेच आम्हाला बघून नाकं मुरडतात जणुकाही आम्ही गुन्हेगार आहोत.


शकुंतला जोगदंड : आम्हाला येऊन ३ दिवस झाले मुलगी २ दिवसांपासुन आजारी आहे, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक कोणीही आमची विचारपूस करायला आले नाही, आम्हाला दवाखान्यात जाता येत नाही, तुम्हिच सांगा आम्हि काय करायचं


सुनिल छबुराव शेळके:

पिण्याचे पाणी सोय करा अशी विनंती केली असता तलाठी कांबळे म्हणतात तुमच्यासाठी छावणी नाही सुरू केली, पाणी,चारा धान्य पुरवायला. तुमची तुम्हीच व्यवस्था करावी.मग आम्ही आमच्या मुकादमाच्या ( लक्ष्मण बापुराव कदम मो.नं.९१५८४६४२६३) रानात पाण्याची सोय आहे,म्हणून आलोत.


सोनाली भरत शेळके :

ग्रामसेवकांने लाईटची व्यवस्था केली नाही, ३दिवसापासून रात्री व्हयाच्या अगोदर स्वयंपाक करून बसावं लागतं पण अंधाराची विंचु कार्याची भिती वाटते, झोप येत नाही.


डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर :

मा.राहुलजी रेखावार जिल्हाधिकारी बीड यांनी ऊसतोड मजुरांच्या सुरक्षित निवासस्थानी ठेवायला हवं , जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही शुद्ध पिण्याचे पाणी , शौचालय, विद्युत पुरवठा, आरोग्य सेवा न देणा-या संबंधित सरपंच , ग्रामसेवक , तलाठी , आरोग्य सेवक ,यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे केली आहे.

Back to top button