औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

तालुक्यातील घोसला येथे अ.भा.ग्रा.पत्रकार संघ व भटके-विमुक्त आ. वि. परिषदेच्या वतीने गोर गरीब आदिवासींना मास्क व शिधा वाटप

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― लाॅकडाऊमुळे काम धंदा गमावून उपासमारीची वेळ आलेल्या घोसला (ता.सोयगाव) येथील मजुरांना भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व भटके-विमुक्त आदिवासी विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने दि.५ रविवारी घोसला ता सोयगाव येथील गोरगरीब समाजसेवक मा. आदिवासींना भटके-विमुक्त आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष अमिनभाई जामगावकर व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण आबा सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच सुकदेव नामदेव बावस्कर पा. यांच्या हस्ते शिधा व मास्कचे वाटप करीत मदतीला सरसावल्याने सर्वत्र कौतुक होत आहे .
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखला जातो. शेतकरी, गोरगरीब, रुग्ण, शहरासह खेडे गावातील अनेक समस्या शासनापर्यंत पोहचविण्यासाठी स्वखर्चाने झटत असतो.सद्या मात्र कोरोना महामारीच्या संकटास, देश लाॅक डाउन पद्धतीने सामोरे जात असतांना, तळहातावर पोट असलेल्या गोर गरीब जनतेवर ,” इकडे आड तिकडे विहीर ” अशा अवस्थेत उपासमारीची वेळ आली आहे.”आम्ही आपले देणे लागतो” या प्रमाणे घोसला गावातील कष्टकरी मजुरांची माहिती घेऊन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व भटके-विमुक्त आदिवासी विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील घोसला या गावातील १०० लोकांच्या घरापर्यंत जाऊन शिधावाटप करण्यात आले तसेच कोरोना संक्रमण रोखण्यासाठी ग्रामस्थांना मास्कचे वाटप करण्यात आले. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ मराठवाडा संघटकसंघटक व जेष्ठ समाजसेवक ज्ञानेश्वर वाघ,निर्भिड पत्रकार तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे,सचिव संदीप इंगळे,उपाध्यक्ष नारायण चौधरी,भटके-विमुक्त आदिवासी विकास परिषद जिल्हा कार्याध्यक्ष तथा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शेख गुलाब (मामु),सदस्य विकास पाटील,भावराव मोरे,ईश्वर इंगळे,आबा उगले, समाधान घुले अनिल तडवी,ग्रामसेवक मोरे आदी उपस्थित होते . कष्टकरी मजुरांना वेळीच सहकार्य मिळाल्याने मजुरांनी समाधान व्यक्त केले.


Back to top button