परळी:आठवडा विशेष टीम―महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नशिबी सतत संकटाची मालिका चालू आहे त्यामध्ये दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपीट नोटबंदी लॉक डाऊन मार्केट मधील चढ-उतार यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे करिता तेलंगण राज्याचा आर्थिक मदतीचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे खरीप रब्बी पिके भाजीपाला बारामही शेती निगडीत व्यवसायामध्ये सतत शेतकरी मेहनत करून पिके काढून उत्पादन मिळवतो परंतु त्याच्या हातात बाजारपेठ नसल्यामुळे भाव योग्य मिळत नाही त्यामुळे आर्थिक उन्नती मध्ये नेहमीच चढ उतार असल्यामुळे हमेशा शासनाच्या मदतीवर अवलंबून शेतकरी राहतो खरीप व रब्बी दोन्ही पिकाचे उत्पन्न मिळाल्यावर बाजारपेठेत घेऊन आला वर व्यापारी संगनमताने भाव पडतात त्यामुळे त्याला शासनाने दिलेल्या हमीभाव सध्या व्यवस्थित मिळत नाही करिता शासनाने कर्जवाटप धोरण व मालाचे भाव यासंदर्भात काटेकोरपणे नियमाचे पालन केले जात नसल्यामुळे शेतकरी अडचणी येतो आजच्या कोरणा विषाणू रोगामुळे तर शेतकरी सगळ्या बाजूने हतबल झालेला आहे राज्य बंदी जिल्हा बंदी घातल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची आर्थिक नाडी बिघडून गेली आहे भाजीपाला फळे अक्षरश रस्त्यावर फेकून द्यावी लागत आहे कोणी खरेदी करण्यास तयार नाही शेतामध्ये प्रचंड प्रमाणात भाजीपाला फळे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतली आहे पण लॉक डाऊन मुळे चारी बाजूने शेतकरी अडचणीत आला व राज्य बंदी जिल्हा बंदी त्यामुळे ते जास्तच अडचणी वाढल्या ग्राहक नसल्यामुळे शेतमाल सडून जात आहे ट्रॅक्टर पिकावर फळावर फिरवून नांगरणी करीत आहे या सर्व समस्या त्याच्या नशिबी आलेले आहेत त्यामुळे संकटाची मालिका शेतकऱ्यावर निसर्गाची व शासनाची चालूच आहे परंतु अशा वेळेस शासनाने शेतकऱ्याचे पाठीमागे सर्व मदत देऊन खंबीरपणे उभे राहणे काळाची गरज आहे अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाकडे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केली आहे बाजार समितीकडे कापूस हरभरा तूर इतर पिकाची ऑनलाइन नोंदणी साठी शेतकरी जातो त्यामध्ये बाजार समितीच्या अंतर्गत अगोदरच दलालांनी जास्त बोगस नोंदी केलेल्या असतात त्यामुळे खरा शेतकरी शासनाच्या योजनेपासून अलिप्त राहतो बोगस नोंदणी शेतकऱ्यांच्या नावाने दर्शवलेले असतात परंतु खरे दलाल व्यापारी यांच्याच नोंदी आहेत महाराष्ट्र शासनाने तेलंगणा राज्याचा खरीप रब्बी पिकासाठी बी बियाणे खते औषधी अवजारे पेरणी पूर्वी बँकेत शेतकऱ्याच्या शेत जमिनी प्रमाणे आर्थिक मदत ज्या त्या बँकेच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातात त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक संकट पेरणीच्या वेळेस दूर होते त्यामुळे शेतकऱ्यासाठी तेलंगणा राज्याचा पॅटर्न देशात आदर्श गणला जात आहे करिता महाराष्ट्राने महा विकास आघाडी सरकारने तात्काळ सर्व बाजूने अभ्यास करून राज्यात लागू करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली.