परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― येथील औष्णिक विद्युत केंद्रातील श्रीगणेश मुंडे यांची महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या परळी झोन अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या सर्व पदाधिकारी यांचे आभार मुंडे यांनी मानले आहेत.
औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ, जि.बीड येथील महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या परळी झोनलची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि.04 मे 2020 योजी व्हडिओ काँन्फरन्सव्दारे बैठक संपन्न झाली. झोनलची कार्यकारणी तथा सर्कल कार्यकारिणीची निवड कोरोना जन्य परिस्थिती व लाँकडाऊनमुळे व्हडिओ काँन्फरन्सव्दारे केंद्रीय कार्यकारणी सदस्य काँ.डॉ. सुधीर मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आली. यावेळी परळी झोनच्या अध्यक्षपदी श्रीगणेश मुंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी अशोक मुंडे, बालासाहेब गर्जे, ऋषिकेश मुंडे, संदीप पाटील, सोमेश्वर कस्तुरे, वसंतराव बारकुले, संदिप काळे तसेच अविनाश जाधव, अनिल जाधव, रमाकांत शिंदे, प्रकाश बोबंले, विजय गुट्टे, प्रदीप फड, आबासाहेब गायकवाड, संजय मुंडे, कृष्णा मुंडे, मुंजा सोनवणे, सचिन शिंदे, सायस मुंडे, जनार्धन बोंबले, मदन बिडगर, मिलींद क्षीरसागर महिला लक्ष्मीबाई वाडकर, पूजाताई राठोड, सविताताई कदम, ज्योतीताई फड, जयश्रीताई फाटक, सर्व झोनल कार्यकारणी व सर्कल कार्यकारणी सर्व पदाधिकारी यांची सर्वानुमते कोरोना जन्य परिस्थिती व लाँकडाऊन असल्यामुळे व्हडिओ काँन्फरन्सव्दारे सर्व पदाधिकारी यांच्या सहमतीने घेऊन निवड करण्यात आली आहे.
श्रीगणेश मुंडे यांनी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी फेडरेशनच्या आंदोलन असो कुठल्याही कर्मचारी वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर आहेत. त्यांनी फेडरेशनच्या उपाध्यक्षसह इतर पदांवर प्रामाणिक पणे काम केले आहे. प्रशासकीय कार्यालयात आलेल्या सर्व समस्या असो किंवा प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात, संप व आंदोलनात नेहमीच सहभागी होऊन सक्रिय सहभाग नोंदवतात. त्यांनी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून संगोपन करत वृक्ष जोपासली आहेत. 2018 साली उत्कृष्ट कर्मचारी म्हणून ही गौरविण्यात आले आहे. औष्णिक विद्युत केंद्राचे तत्कालीन मुख्य अभियंता विठ्ठल खटारे यांच्या हस्ते चांगल्या प्रकारे काम केले म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. औष्णिक विद्युत केंद्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमात क्रिकेट स्पर्धेत पारितोषिक पटकावले आहे. 2016 साली भुसावळ येथे स्पोर्ट्स ला परळी संघ व्यवस्थापक हे पद सांभाळले आहे. तसेच वेगवेगळे उपक्रम राबविणे , कामगारांचे प्रश्न सोडविणे, सर्व सामान्यांच्या समस्या सोडविणे याच बरोबर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी फेडरेशनचे कार्य मजबुत करण्यासाठी सतत कार्यरत राहून नेहमीच तळागाळापर्यंत फेडरेशनचे कार्य पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या सर्व कार्याची व कामगारांच्या निःस्वार्थ पणे केल्या कमाची दखल घेऊन त्यांची झोनल अध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. संघटनावाढीसाठी व मजबुतीसाठी अथक परिश्रम घेऊन व कामगारांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी संघटनेचे विचार पोहोचून फेडरेशन वाढीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. सध्या वरिष्ठ लिपिक मांस विभागात कार्यरत आहेत.
दरम्यान महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी फेडरेशनच्या सर्व पदाधिकारी यांनी सोपविलेली जबाबदारी व केलेली निवड सार्थ ठरविण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू तसेच कोणत्याही कर्मचारी वर्गावर अन्याय झाला तर वेळोवेळी आवाज उठवून न्याय मिळवून देणार असे सांगून नवनिर्वाचित झोन अध्यक्ष श्रीगणेश मुंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. या निवडीबद्दल नवनिर्वाचित झोन अध्यक्ष श्रीगणेश मुंडे यांचे सर्व वरिष्ठ कार्यकारिणी, झोन कार्यकारिणी व सर्व सभासद तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी, शैक्षणीक, पत्रकार, सामाजिक, राजकीय क्षेञातील मान्यवर, मित्र परिवार व नातेवाईकांकडून स्वागत व सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
0