परळी:आठवडा विशेष टीम― वृत्तवाहिनीसाठी काम करणारे वार्ताहर संभाजी मुंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला करण्यात आहे. सोमवार, दि.११ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास सदरील घटना घडली. या घटनेत संभाजी मुंडे यांच्यासह मुलगा विष्णू आणि त्यांच्या पत्नी जखमी झाले आहेत.
सोमवार दि.११ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पत्रकार संभाजी मुंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ७ ते ८ जणांनी सशस्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात संभाजी मुंडे आणि त्यांचे कुटुंबीय जखमी झाले आहेत. परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. प्राणघातक हल्ल्याच्या मागील सूत्रधार कोण? याची माहिती पोलीस घेत असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मागील दोन महिन्यांत परळीत पत्रकारांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे.
0