सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे, खा.सुनील तटकरे यांच्यासह विशाल भडांगे यांच्यावर राजकीय, विविध क्षेत्रातील मान्यवर शेतकऱ्यांकडून शूभेच्छांचा वर्षाव
परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा.बीड जिल्हाच्या पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे समर्थक शिर्डीचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल भडांगे यांनी कोरोना विषाणुचे गांभीर्य लक्षात घेवून वाढदिवस साधेपणाने व रक्तादान करून साजरा केला. तसेच 50 गरजुवंतांना जिवनावश्यक किटचे वाटप करून दिला मदतीचा आधार व रक्ताचाही तुटवडा ही मोठ्या प्रमाणात जाणवतोय.ही बाब लक्षात घेऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आरोग्य सेवेला मदत व सहकार्य करण्याच्या विधायक हेतूने सामाजिक कार्य केले असल्याचे श्री. भडांगे यांनी सांगितले.
देशात सर्वत्र कोरोना विषाणूमुळे राज्यात लॉकडाऊनची परस्थिती आहे. तर दुसरीकडे रक्ताचाही तुटवडा ही मोठ्या प्रमाणात जाणवतोय. ही बाब लक्षात घेऊन येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ , आ.रोहित पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे, खा.सुनील तटकरे, आ.अनिकेत तटकरे , अहमदनगर आरोग्य विभाग यांनी आपल्या सर्वांना काही दिवसांपूर्वीच आवाहन केल्यामुळे सोमवार, दि.12 मे 2020 रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष ना धनंजय मुंडे साहेब युवा मंच व धनंजय मुंडे आरोग्यमित्र प्रमुख विशाल भडंगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी रक्तदान करून एक वाढदिवसानिमित्त एक सामाजिक संदेश दिला आहे. 50 गरजुवंतांना कुटुंबांना 15 दिवस पुरेल ऐवढे जिवनावश्यक किटचे वाटप करून मदतीचा आधार दिला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
देशातील प्रसिद्ध श्री.साईबाबा नगरीतील अंत्यंत कमी वयात त्यांनी सांगितले आपल्या कार्याची ओळख राज्य भर निर्माण करणारे व्यक्तीमत्व म्हणून विशाल भडांगे हे सर्व परिचित आहेत. सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आदीसह विविध क्षेत्रात सदैव अग्रेसर आणि एकरुप होतात. त्यांच्या कार्याची दखल घेत अनेकांनी कौतुकाची थाप देऊन त्यांच्या कार्याला प्रेरणा दिली आहे. सामान्य नागरिक असोकी विद्यार्थी असो सर्वांच्या अडीअडचणी धावून जाणारे तरूण तडफदार व.अभ्यासू नेतृत्व आहेत. एकंदरीत, सर्वसामान्य परिस्थितीतून उच्च शिक्षण घेतल्यानंतर अहमदनगर/ शिर्डी जिल्ह्यातील नव्हे ; तर संपूर्ण राज्यात प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे तसेच सातत्याने शहरी व ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या हिताला प्राधान्य देवून त्यांच्या उपयोगी पडणारे नेतृत्व आहे.शहरी व ग्रामीण भागातील विकासाचे विविध प्रश्न सोडवून घेण्यासाठी त्यांनी सातत्याने आग्रहाची भूमिका घेवून तसे कार्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी शिर्डी विधानसभा मतदार संघात पक्षाला ताकद देण्याचे काम त्यांनी केले आहे. धार्मिक , शिक्षण संस्था,विविध सांस्कृतिक तसेच साहित्यीक उपक्रमात त्यांचा सातत्याने सक्रिय सहभाग राहिला आहे. विशाल भडांगे यांना उदंड,निरोगी दिर्घायुष्य लाभावे व त्यांच्या हातुन शहरी ग्रामिण भागातील जनतेची यापुढे ही अखंड सेवा घडावी अशी अपेक्षा आज अभिष्टचिंतनाचा दिन आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या भविष्यातील कार्याला आणि आनंदी सुखी जीवनाला खूप शुभेच्छा. अतिशय शांत,नेहमी हसतमुख असणारे,राजकीय , सामाजिक या दोन्हीं क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवनारे विशाल भडांगे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे, खा.सुनील तटकरे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याची विधी व न्याय उद्योग व पर्यटन मंत्री ना.आदित्य ताई तटकरे, राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अनिकेत भाई तटकरे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष मेहबूब भाई शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्यासह डॉक्टर्स, वकील, व्यापारी, पत्रकार, धार्मिक, शेतकरी विविध राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी तसेच शहरी ग्रामीण भागातील मित्र परिवारातर्फेही वाढदिवसानिमित्त विशाल भडांगे यांचा सत्कारूपी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच कोरोनाच्या संकटात विविध वर्तमान पत्रे, व्हाट्सअॅप, एसएमएस, मोबाईल, फेसबुक आदींच्या माध्यमातुनही त्यांच्या राज्यातील हजारों हितचिंतकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव पाहुन विशाल भडांगे अक्षरशः भारावुन गेले होते. सर्व शुभेच्छांचा श्री.भडंगे यांनी स्विकार करुन आपल्याला या शुभेच्छामुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्याची आणखी मोठी प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी 9 पासुन रात्री 11 वाजेपर्यंत असंख्य कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या व त्यांना पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, यांच्यासह राज्यातील. हजारोंच्या हितचिंतक व शिर्डी परिसरातील विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांचा समावेश होता.
वाढदिवस निमित्ताने आपण दिलेल्या या शुभेच्छा माझा आत्मविश्वास अधिक पटीने वाढवणाऱ्या असून भविष्यात काम करताना अधिक स्फुरण देणाऱ्या आहेत.आपले प्रेम, प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि साथ अशीच आयष्यभर कायम राहुद्या. कोरोनाच्या या लढ्यात घरीच थांबून साथ द्या. प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
सदैव तत्परता बाळगणारे व्यक्तीमत्व
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांचे विश्वासतले म्हणून ओळख ,जनसामान्य कार्यकर्ते सोबत घेऊन चालणारे ,गर्व न करता ,शांत संयमी व अभ्यासु ,सतत कार्यमग्न , पक्षनिष्ठा असलेले व संघटनात्मक वाढीसाठी कठोर परिश्रम घेणारे तसेच सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले आणि हलाखीच्या परिस्थितीमध्ये समाजाची सेवा करण्याच्या दृष्टीने सदैव प्रयत्नशील असणारे श्रीक्षेत्र देवस्थान शिर्डी तालुक्यातील एक जागृत नेतृत्व विशाल भडांगे यांंचा नामोल्लेख होतो. यांच्या कुशल प्रयत्नातून अनेक सामान्यांची कामे घडून आली. सर्व समाजात एका बहुगुणी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सदैव सामान्यांची नाळ जोडत सामान्य लोकांच्या हितासाठी सदैव तत्पर राहून सकारात्मक कार्य तेवत ठेवणारा ठरतो आहे. देशभरासह राज्यातील सर्व कानाकोपऱ्यात येणाऱ्या साईबाबांच्या भक्तांचे सेवा करणारे. सुलभ दर्शन उपलब्ध करून व माहिती देणारे असे धार्मिक वृर्तीचे नेतृत्व विशाल भडंगे आहेत. असे या समद्या नेतृत्वाकडे नागरिक एका आपुलकीच्या भावनेतून आदरयुक्त विशाल भडांगे यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण सकारात्मक ठरला आहे.