विद्यार्थ्यांना गावाकडे जाण्यासाठी केली तीन बसमधून गावाकडे रवाना
परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच संकटात विविध भागातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या विद्यार्थी पुणे येथे अडकलेले होते. त्यांच्या दोन वेळेचे मोफत जेवणाची व्यवस्था करून अनिलकुमार गित्ते यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा आधार दिला आहे. तसेच त्या विद्यार्थी आपल्या गावी जाण्यासाठी खाजगी तीन बसची व्यवस्था करून स्वारगेट ते बीड येथील विद्यार्थीना गावाकडे जाण्यासाठी रवाना केले आहेत. त्यामुळे विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त करत अनिलकुमार गित्ते यांचे आभार मानले आहेत. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.परळीचे भूमिपुत्र अनिलकुमार गित्ते यांची सामाजिक संवेदनाचे समाजातून कौतुक होत आहे.
कोरोना महामारीमुळे मागील दोन महिन्यापासून संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशा चिताजनक परिस्थितीत पुणे येथे अडकलेल्या राज्यभरातुन आलेल्या स्पर्धा परीक्षेचा तयारी करण्यासाठी आलेल्या व इतर विद्यार्थ्यांसाठी सामाजिक संघटना, नाथ प्रतिष्ठान व हाँटेल मराठवाडा वतीने दोन वेळेचे जेवन मोफत वाटप करण्यात येत आहे. हा सामाजिक उपक्रम गेल्या दोन महिन्यापासून न खंड पडू देता परळी तालुक्यातील बेलंबा येथील भूमिपूत्र यशस्वीपणे राबवित आहेत. हा उपक्रम राबवित असतांना गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी परळी व बीड जिल्हा येथे जाण्यासाठी तीन खाजगी बसची व्यवस्था करून दिली आहे. तसेच या आगोदर ही त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके व मास्क, सेनिटरायर मोफत वाटप करून माणुसकी जागवली आहे.
लॉकडाऊन काळात येथे अडकलेल्या स्पर्धा परीक्षाच्या तयारी करण्यासाठी आलेल्या पुणे येथे स्वारगेट ते बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनासाठी आज आरोग्य तपासणी , सोशल डिस्टन्स, मास्क ,सेनिटरायर व जेवणाची बिसलरी व्यवस्था करून एसटी गाड्यांमधून रवाना करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वत खर्चाने करून अनिलकुमार गित्ते व यांनी तीन खाजगी ट्रव्हल्स करून त्यांच्या गावी रवाना करण्यात आले आहे.गावी जाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी समाधान व्यक्त करत अनिलकुमार गित्ते यांचे आभार मानले.
पुण्यामध्ये जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अडकलेले विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली. अश्यावेळी त्यांनी उपाशी राहू नये म्हणून अनिलकुमार गित्ते यांनी समाजाला आपले काही देणे लागत या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या दोन वेळेसच्या जेवणाची व्यवस्था करून देऊन मदतीचा हात पुढे केला. तसेच स्वतः खर्च करून तीन बसची व्यवस्था करून अडकलेल्या विद्यार्थ्यांना गावाकडे रवाना केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
पुणे येथे 25 मार्च पासून सुरू केलेला हा उपक्रम आजतागायत सुरळीतपणे सुरू आहे. यासाठी सचिन ढवळे सर, गजानन ठोकळे, सहदेव घुगे हे सर्वजण परीश्रम घेत आहेत. या उपक्रमास स्वेच्छेने अनेक बांधवांनी आर्थिक मदत केली. तसेच अनेक बांधवांनी अन्नधान्य व भाजीपाला स्वरूपात मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम गेल्या 48 दिवसापासून अखंडितपणे चालू आहे. तसेच हा उपक्रम लॉकडाउन व संचारबंदी संपेपर्यंत चालूच ठेवण्याचा निर्धार अनिलकुमार गित्ते यांनी सांगितले. हा उपक्रम राबविल्यामुळे अनिलकुमार गित्ते यांनी दाखवलेल्या सामाजिक संवेदनाचे समाजातून कौतुक होत आहे.