पोलीस भरती

सोयगाव: आदिवासी रामपूरवाडीत शिक्षणासाठी लॉकडाऊनमधील धडपड ,दूरदर्शनच्या कार्यक्रमातून घेताय शिक्षणाचे डोस

सोयगाव,दि.१५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे तब्बल महिनाभरापासून प्राथमिक शाळा बंद असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षकांना आॅनलाईन शिक्षणाचे डोस विद्यार्थ्यांना देण्याचे आदेशित केले आहे.परंतु आदिवासी रामपूरवाडीला पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन नसल्याने या विद्यार्थ्यांनी चक्क दूरदर्शन वरील कार्यक्रमातून शिक्षणाचे डोस घेण्याची चिकाटी दर्शविली आहे.
सोयगाव तालुक्यात पहिली ते आठवी पर्यंत जिल्हा परिषदेच्या ९४ शाळा आहे त्यामध्ये तब्बल ९० शाळांमधील १३२१८ प्राथमिक विद्यार्थी लॉकडाऊनमध्ये आॅनलाईन शिक्षणाचे डोस घेत असल्याची माहिती शिक्षणविस्तार अधिकारी राजेंद्र फुसे यांनी दिली आहे.मात्र आदिवासी भागातील रामपूरवाडीच्या प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथी वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे चक्क स्मार्टफोन नसल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे आॅनलाईन शिक्षणाच्या धड्यांपासून या शाळेतील ३६ पटावरील उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना चक्क स्मार्टफोन अभावी दूरदर्शन वरील कार्यक्रमातून शिक्षणाचे डोस घ्यावे लागत आहे.

आख्ख्या गावात एकाच दूरदर्शन संच-

आदिवासी वस्ती असलेल्या अख्ख्या रामपूर वाडीत एकाच दूरदर्शन संच असल्याने या एका दूरदर्शन संचावर गावातील सर्वच विद्यार्थी प्राथमिक शिक्षणाचे डोस घेत आहेत.त्यामुळे कोरोना संसर्गाच्या लॉक डाऊनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची प्राथमिक शिक्षणाची तारांबळ उडाली आहे.

आदिवासी भाग असलेल्या या वाडीत ग्रामस्थांच्या पोट भरण्याची चिंता आहे.त्यामुळे पोट हातावर असलेल्या या गावातील ग्रामस्थांकडून स्मार्टफोन घेणे अशक्य आहे.परंतु विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षणाचे नुकसान होवू नये यासाठी त्यांना दूरदर्शन वरील शैक्षणिक कार्यक्रमात सामावून घेतल्या जात आहे.
―संतोष मोरे
आदिवासी ग्रामस्थ

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *