बीड दि.१६:आठवडा विशेष टीम― कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असताना बीड जिल्ह्याने इतके दिवस कोरोना विरोधात लढविलेली खिंड अखेर पडली. मुंबई आणि पुण्याहून विना परवाना बीड जिल्ह्यात आलेल्या गेवराई आणि माजलगाव मधील प्रत्येकी एक अशा दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आता बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन वर गेली आहे. बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मागील महिन्यात सापडलेला रुग्ण नगर जिल्ह्याच्या जवळ असलेल्या आष्टी (जि.बीड) या तालुक्यातील होता. तसेच त्याच्यावर अहमदनगरमध्येच उपचार सुरु होते आता मात्र बीड जिल्ह्यातील गेवराई आणि माजलगाव या तालुक्यातील कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.गेवराई येथील रुग्ण पुण्याहून तर माजलगाव येथील रुग्ण मुंबईवरून विना परवाना बीड जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती आहे. या दोन रुग्णांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची पुष्टी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी केली आहे.आता या दोघांच्याही संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची कारवाई आरोग्य विभागाकडून सुरु झाली आहे.यामुळे आता बीड जिल्ह्याला अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
0