अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
देशासह संपूर्ण राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे सभोवतालची परिस्थिती अत्यंत गंभीर होत आहे.राज्याचे मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री आणि सर्व सरकार मिळून या परिस्थितीतून राज्याला बाहेर काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.अशा परिस्थितीत मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सध्या सुरू आहे.रमजान ईद या सणानिमित्त होणारा खर्च शक्यतो गरिबांना देऊन सर्व मुस्लिम बांधवांनी आपली ईद साजरी करावी.तसेच कोरोनाला हरवण्याचा लढाईत आपला सक्रिय सहभाग द्यावा असे आवाहन कॉमनवील मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटी,कपडा बँकेचे अध्यक्ष हकीम लाला पठाण यांनी केले आहे.
अंबाजोगाई शहरात व तालुक्यात कोरोनाबाधित रूग्ण नसल्याने रमजान ईदच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या मुस्लिम बांधवांनी बाजारात व खरेदीच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नये,फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे,शक्य असेल तर आपण आपल्या घरातच थांबावे,सुरक्षित रहावे.केंद्र-राज्य सरकार, जिल्हा व तालुका प्रशासन यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन कॉमनवील मल्टीपर्पज चॅरीटेबल ट्रस्ट आणि रोटी,कपडा बँकचे अध्यक्ष हकीम लाला पठाण यांनी केले आहे.
गरजू लोकांना मदत करून ईद साजरी करा
सध्या लॉकडाऊनमुळे समाजातील गोरगरीब आणि गरजू लोक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत.अशा काळात ईद वर होणारा खर्च गरजू लोकांना देऊन सहकार्य करा,समस्त मानवजातीचे कल्याण,भुकेल्यांना अन्न व गरजूंना तत्पर राहून मदत करणे ही इस्लाम धर्माची मुलभूत शिकवण आहे.याचा अवलंब करावा.तसेच व्यापारी बांधवांनी 2020 हे वर्ष फक्त जिवंत राहायचे आहे.नफा व नुकसान या विषयी अजिबात विचार करू नका.स्वप्न आणि योजना याविषयी चकार शब्दही काढू नका.यावर्षी
स्वतःला व कुटुंबियांना जिवंत ठेवणे महत्त्वाचे आहे.जिवंत राहणे हाच सर्वांत मोठा नफा असल्यासारखे आहे.तेव्हा घरी रहा,सुरक्षित रहा.
―हकीम लाला पठाण (अध्यक्ष,कॉमनवील मल्टिपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट,अंबाजोगाई.)