सोयगाव,दि.१७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
भडगाव(जि.जळगाव)येथे पुणे,मुंबईच्या चार नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या सोयगाव तालुक्यातील त्या खासगी डॉक्टरचा कोविड-१९ चा अहवाल नकारात्मक असल्याचा अहवाल भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने रविवारी दिल्याने पळाशीसह वाडी,पळाशीतांडा या चार गावांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
भडगाव जि.जळगावला नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेला तो खासगी डॉक्टर चार सकारात्मक असलेल्या चार रुग्णांच्या संपर्कात रात्रभर आला होता.या घटनेची माहिती मिळताच पळाशी ग्रामस्थ सतर्क होवून त्यांनी आरोग्य विभागाकडून स्वतः होमकोरोटाईन करून घेतले होते,दरम्यान सरपंच आशा बाई सोनवणे,ग्रामसेविका कल्पना कचरे,उपसरपंच वामन लोखंडे,सुभाष वाडकर,आदींनी गावभर फवारणी करून पळाशी गावाचे निर्जंतुकीकरण केले होते,तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना मास्क आणि सॅनिटायझरचे घरोघरी वाटप केले,परतू त्या डॉक्टरच्या स्वॅबचे घेतलेले नमुने नकारात्मक असल्याचा अहवाल मिळताच या चार गावांना दिलासा मिळाला आहे.
कोविड-१९च्या तडाख्यातून सोयगाव तालुका दुसर्यांदा वाचला-
कोविड-१९ च्या तडाख्यातून आठवडाभरात सोयगाव तालुक्यातील यापूर्वीचे चार आणि रविवारचा एक असे सलग पाच नमुने नकारात्मक मिळाल्याने सोयगाव तालुक्याला दुसऱ्यांदा दिलासा मिळाला आहे.त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह महसूल,पंचायत समिती,वनविभाग आदी यंत्रणा सतर्क झाल्या आहे.
पळाशी गावात कोविड-१९ च्या तपासणीत होमकोरोटाईन करण्यात आलेल्या ५० ते ७० जणांची सलग १४ दिवस तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
पळाशी गावात आरोग्य विभागाचे पथक ठाण मांडून असून पुढील काळजी घेण्यासाठी आरोग्य आणि महसूल आणि ग्रामपंचायत प्रशासन सतर्क करण्यात आले आहे.