पाटोदा :पाटोदा तालुका साप्ताहिक संपादक व पञकारची बैठक मंगळवार दि ०५/०२/२०१९ रोजी शासकीय विश्रामगृह पाटोदा येथे ज्येष्ठ पत्रकार इद्रीसभाई चाऊस यांच्या अध्यक्षतेखाली तर संजय जावळे,दिंगाबर नाईकनवरे, बंडु डिडुळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व बाजीराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
यावेळी मावळ अध्यक्ष संपादक हामिद पठाण,यांनी मागील वर्षातील लेखाजोखा मांडला यानंतर नय्युम पठाण,महेशर शेख,सय्यद साजेद,यांनी आपले मनोगत व्यक्त करून पत्रकारांवर येणाऱ्या विविध अडचणी मांडल्या.यानंतर बैठकीमध्ये पाटोदा तालुका साप्ताहिक संपादक व पञकार संघाची कार्यकारणीची निवड करण्यात आली यावेळी पाटोदा तालुका साप्ताहिक संपादक व पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणेश शेवाळे, व उपाध्यक्षपदी सचिन गायकवाड यांची निवड करण्यात आली असुन सचिव पदी सचिन शिंदे तर कार्याध्यक्षपदी हामिद पठाण यांची निवड केली यावेळी पञकार सय्यद सज्जाद,शेख महेश्वर,नईम पठान,प्रा.बबन पवार, डॉ.हरिदास शेलार,जाकिर पठाण,पवन भोकरे,लोढे दिनेश ,ऋषिकेश विघ्ने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पञकार इद्रिस चाऊस व उपस्थित मान्यवरांनी अध्यक्ष गणेश शेवाळे व सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करून पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.बबन पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सय्यद सज्जाद यांनी मानले
0