पाटोदा दि.१८:गणेश शेवाळे― बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात सात रुग्ण कोविड१९ पॉझीटिव्ह आढळले आहेत. विशेष म्हणजे सात ही रुग्ण बाहेर जिल्हातून आपल्या भागात आले आहेत या आधी बीड जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसतांना परवा गेवराई (एक) व माजलगाव (एक) असे दोन तर आष्टी तालुक्यात आज सात रुग्ण आढळल्याने साहाजिकच लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
आपल्या भागातील असंख्य लोक औरंगाबाद, पुणे, मुंबई यासारख्या अनेक ठिकाणी नौकरी – व्यवसाय, उपजीविकेसाठी वास्तव्यास आहेत. गेली बरेच दिवस लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले असल्याने बाहेरील लोक जस जमेल तस आपल्या घरी, गावी येण्यासाठी प्रयत्न करतात.बीड जिल्हा प्रशासन दक्ष आणि सतर्क आहे, परंतु काही लोक गैरमार्गाने प्रवेश करत आहेत. यामुळे असे प्रकार घडत आहेत यापार्श्वभूमीवर आष्टी पाटोदा शिरूर चे आमदार बाळासाहेब आजबे यांनी आवाहन केले आहे की आपल्या बाहेरगावी नातेवाईकांना, हितसंबंधीत लोकांना आवर्जून सांगा कोणीही अनधिकृतरित्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करू नये किंवा कोणी प्रवेश करत असताना तुम्ही देखील कोणाला मदत करू नये आणि असं कोणी आढळले तर ग्रामस्थांनी तात्काळ ग्रामसेवक, तहसीलदार किंवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क करावा. याऊपर काही अडचण आल्या तर तात्काळ मला संपर्क करा व आपल्या मतदारसंघात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास सहकार्य करा. मतदारसंघातील नागरिकांनी कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी घरी रहा सुरक्षित रहा व घाबरू नका परंतु काळजी घ्या.आता आपली जबाबदारी आधिक वाढली आहे. असे आवाहन आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.
0