सोयगाव,दि.२१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोविड-१९ चा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढता प्रसार पाहता आता यापुढे सोयगावातच संशयित रुग्णांच्या स्वॅबचे नमुने घेण्यासाठी तयारी झालेली असून सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला सहा(व्ही.टी.एम) व्हायरल मेडिया पुरविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.शंकर कसबे यांनी दिली आहे.
कोविड-१९ चा सोयगाव तालुक्यात एकही लक्षणे असलेला रुग्ण आढळलेला नाही.परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोविड-१९ चा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निष्कर्षात आल्याने सोयगावला आढळलेल्या संशयित रुग्णाला आता स्वॅब घेण्यासाठी औरंगाबादला घेवून जाण्याची गरज नसून आवश्यकता भासल्यास आता सोयगावला स्वॅब घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.कोरोना संसर्गाच सोयगाव तालुक्यात एकही रुग्ण आढळलेला नसल्याने सोयगाव सुरक्षित आहे.परंतु धोका टाळण्यासाठी सोयगावला जिल्हा प्रशासनाने सहा व्हायरल मेडिया पुरविल्या आहे.ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.शंकर कसबे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित सपकाळ,डॉ.शिल्पा देशमुख,डॉ.केतन काळे,आदि स्वॅबचे काम करत आहे.
सोयगाव ग्रामीण रुग्णालयात १४३६ बाहेरून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ८१७ जणांचा होमकोरोटाईनचा कार्यकाळ संपलेला आहे.त्यामुळे सोयगाव कोविड-१९ च्या धोक्यापासून तूर्तास दूर झालेला आहे.