बीड:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील पाटबंधारे विभाग क्र.३चे कार्यकारी अभियंता करपे यांच्या आशीर्वादाने बीड जिल्ह्यातील लघुसिंचन तलावांची दुरुस्ती कामे न करताच ३ कोटी रुपयांचा अपहार झाला आहे, संबंधित दोषींवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंडे यांना मा. राहुलजी रेखावार , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड मा.अजितजी कुंभार यांच्या मार्फत ई-मेल द्वारे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे
अंगद कवडे , सरपंच गोलांग्री–
गोलंग्री येथिल लघुसिंचन तलाव दुरुस्तीचे कोणतेही काम २०१९ मधे झालेले नाही, संबंधित अपहार प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार मी दाखल करणार आहे.
तेलप पी.जे. , ग्रामसेवक,गोलांग्री–
मी २०१९ मधे ग्रामसेवक म्हणून मौजे गोलंग्री येथे कार्यरत असताना गोलंग्री लघुसिंचन तलाव शिर्ष भागातील दुरूस्तीचे कुठलेही काम झालेले नाही,मला याची कल्पना सुद्धा नाही.
गवळण महारूद्र भारती , सरपंच मसेवाडी–
२०१९ मधे मसेवाडी लघुसिंचन तलाव शिर्ष भागातील दुरुस्तीचे कोणतेही काम झालेले नाही, या विषयी कोणी पैसे उचलले मला काहिही माहीत नाही.
सावंत ,ग्रामसेवक मसेवाडी–
मी ग्रामसेवक पदी मसेवाडी येथे कार्यरत असताना मसेवाडी लघुसिंचन तलाव शिर्ष भागातील दुरूस्तीचे कोणतेही काम झालेले नाही.
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश ,बीड―
तलाव दुरुस्ती तर सोडाच पण तलावातील भिंतीमध्ये लिंबाची मोठमोठी झाडे उगवली आहेत,त्यांच्यामूळे तलावाला भविष्यात धोका संभवतो, परंतु ती झाडे सूद्धा काढली नाहीत.
बीड तालुक्यातील मौजे मसेवाडी येथिल २ लाख ६७ हजार ३०० रु आणि गोलंग्री येथिल २ लाख ७२ हजार २५० रू.अंदाजित कींमतीचे लघुसिंचन तलाव शिर्ष भागातील दुरूस्तीचे कोणतेही काम न करताच पाटबंधारे विभाग क्र.३ चे कार्यकारी अभियंता करपे यांनी ठराविक गुत्तेदार साष्टांग मजुर सहकारी संस्था मर्यादित वासनवाडी ता.बीड येथिल काळे नामक ठेकेदारांनी संगनमताने ३ कोटी रुपयांचा अपहार केला आहे, संबंधित प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी राहुलजी रेखावार, जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री , कृषिमंत्री , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.