औरंगाबाद:आठवडा विशेष टीम― धनगर समाज क्रांती मोर्चा मार्फत मागील 6 वर्ष पासून पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या तथा धनगर आरक्षण साठी प्राणाचे बलिदान देणारे शहिद मनजीत कोळेकर यांच्या कार्याची स्मृती आठवणी राहावी म्हणून 31 मे पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती च्या पूर्वसंध्येला म्हणजे 30 मे रोजी चा भव्य दीपोत्सव या वर्षी रद्द करण्यात आला आहे अशी माहिती धनगर समाज क्रांती मोर्चा तथा दीपोत्सव समिती चे आयोजक डॉ. संदीप घुगरे यांनी दिली.
यावर्षी कॉरोना संसर्गजन्य रोग मुळे भारत देशात लॉगडाऊन करण्यात आले आहे आणि त्यातच महाराष्ट्र राज्य मध्ये कॉरोना चे रुग्ण सर्वाधिक असल्यामुळे औरंगाबाद जिल्हा रेड झोन मध्ये गेला आहे त्या मुळे आशा परिस्थिती मध्ये लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भक्तांनी एकत्र येणे म्हणजे कॉरोना सारख्या रोगाला आमंत्रित करण्यासारखे आहे, आणि त्यातच अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म ठिकाण श्रीक्षेत्र चोंडी येथील सार्वजनिक जयंती उत्सव रद्द करण्यात आली ची माहिती माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली आहे
त्यामुळे औरंगाबाद शहरात आयोजित होणारा जयंती निमित्ताचा दीपोत्सव रद्द करण्यात आला आहे अशातच पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जयंती आपण आपल्या घरातच अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजन करून करावी अशी विनंती धनगर समाज क्रांती मोर्चा अध्यक्ष डॉ संदीप घुगरे ,कोषाध्यक्ष दीपक महानवर,संजय फटकडे, युवा मेंढपाळ संघटना संघटक शिवाजी नेमाने ,जेष्ठ मार्गदर्शक रामनाथ मंडलिक, नारायण खोसे, सुरेश दोलझाके, मीरा जानराव,दादाराव नजन,दिलीप रिठे, गणेश तोतरे, गणेश सरवदे, शिवाजी धारसुरे, आर.जि. देठे,एकनाथ खटके, ढोले साहेब,शिवाजी वैद्य, यांनी केली आहे.
0