परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमी

धनंजय मुंडेंनी १२००० शिरखुरमा किटचे केले वाटप, परळी राष्ट्रवादी काँग्रेस व नाथ प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम

धनंजय मुंडेंची परळी मतदारसंघातील मुस्लिम समाजबांधवांना रमजान ईदनिमित्त खास भेट

परळी दि. 23:आठवडा विशेष टीम― जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे विविध सण – उत्सव भीतीच्या सावटाखाली घरच्या घरी साजरे केले जात आहेत. यंदा हे सावट मुस्लिम समाजातील सर्वात महत्वाचा समजला जाणारा रमजान ईद या सणावरही आहे. या परिस्थितीत परळीचे आमदार तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी रमजान ईद निमित्त मतदारसंघातील मुस्लिम बांधवांना खास भेट दिली आहे.

ना. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान तथा परळी राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत, नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या नियोजनातून मतदारसंघातील 12000 मुस्लिम कुटुंबांना ईदनिमित्त बनवल्या जाणाऱ्या शिरखुरमा व अन्य गोड धोड पदार्थ बनविण्यासाठी आवश्यक साहित्याचे किट मोफत वाटप करण्यात आले आहे.

यामध्ये परळी शहरात 7000 तर ग्रामीण भागातील 5000 कुटुंबांचा समावेश आहे. या किटमध्ये आटा, साखर, खाद्यतेल, शेवया, खोबरा किस, काजू-बदाम-मनुके आदी सुका मेवा इत्यादी साहित्य समाविष्ट करण्यात आले आहे.

ना. मुंडे हे दरवर्षी परळी येथील समाजबांधवांच्या रमजान ईद सणामध्ये सहभागी होत असतात, परंतु यावर्षी कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीमुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, अशा परिस्थितीत अर्थव्यवस्था ढासळली असून सामान्य माणसाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ना. मुंडे हे मतदारसंघातील सर्वच समाजघटकांना विविध स्वरूपात मदत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.

मुस्लिम समाजातील घरोघरी रमजान ईद गोड व्हावी या उद्देशाने ना. मुंडे यांच्या नेतृत्वात, नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड, रा. कॉ. परळी तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, रा. कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या सुनियोजनाखाली मतदारसंघातील 12000 कुटुंबांना हे किट वाटप केले असून, गरज पडल्यास आणखी किट वाटप केले जातील अशी माहिती नाथ प्रतिष्ठान चे सचिव नितीन मामा कुलकर्णी यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button