बीड:आठवडा विशेष टीम― लिंबागणेश पंचक्रोशीतील खवा तयार करणा-या भटट्या कोरोना महामारीचा दुष्परिणाम म्हणून मोठया प्रमाणावर आर्थिक पटका बसला आहे. त्यामुळे अखेर त्यांनी संयम बाळगुन तग धरत आणलेला व्यवसाय पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेत ,सर्वच खवा भट्टी बंद झालेल्या आढळून येतात.
सविता काटवटे , काटवटे वस्ती खवा भट्टी चालक―
शेती करत असताना गाई, म्हशी सांभाळून जोड व्यवसाय म्हणुन घरासमोरच खवा भट्टी टाकली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समदं सुरळीत चालू असताना कोरोना महामारी मुळं सगळ्यांचं धंद्याला खिळ बसली ,तशी याची छळ आम्हाला सुद्धा पोहचली. दरवर्षी आर्थिकदृष्टया फायदा करून आयुष्यात गोडवा निर्माण करणा-या खव्याने कोरोना महामारीमुळे आयुष्याला कडवट चव आणि अनुभव दोन्ही देऊन गेला.
बबन आबदार , लिंबागणेश खवाभट्टी चालक―
आम्हाला खवा तयार करण्यासाठी पहाटे पासूनच तयारी करावी लागते.दुध घोटण्यासाठी प्रतिकिलो खवा २५ रु.मिळतात. लिंबागणेश परिसरातील खवा रौळसगाव येथे नेऊन द्यायचा.परंतू कोरोनाने बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.म्हणुन वरूनच खवा घेणा-या मालकांनी खवा खरेदीच बंद केल्यामुळे आम्ही खवा तयार करून कुठे विकणार?? शेवटी बाजारपेठा चालु होईपर्यंत खवा भट्टी बंद ठेवण्याचे ठरवले आहे. शेती करून जोडव्यवसाय म्हणुन दरवर्षी दररोज सगळा खर्च जाऊन दिवसाला हजार रुपये मिळतात.परंतु आता तेही कोरोनाच्या अवकृपेने बंद झाले आहेत. शेतक-यांची देव चारी बाजूंनी परिक्षाच बघतोय म्हणायचं दुसरं काय ??
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड―
ग्रामिण भागातील काही दुध उत्पादक दुध डेअरी वर न घालता खवा भट्टी चालकांना देतात.भट्टीचालक खवा प्रत्येक दुधधारकाचे दुध किती लीटर दुध मोजुन त्यापासून दुध आटवुन खवा तयार करून रौळसगांव येथे विकतात तिथे जो भाव लागेल त्या भावानुसार २५ रु. प्रतिकिलो मेहनताना भट्टी चालक घेतात.
बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत,त्याच बरोबर सर्व धर्माची धार्मिक स्थळे बंध असल्यामुळे खवा विक्री वर मोठ्या प्रमाणावर मागणीत घट झाली आहे. त्यामुळे या शेतक-यांचा जोडधंदा म्हणून खवा भट्टी चालकांना कोरोनाने पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या खाईत ढकलले आहे.आता त्यांचा परमेश्वरच मालक…तारणार की मारणार