कोरोना ठरले सारडांसाठी वरदान , १ कोटी ९४ लाखांचा जाळ आण धुर संगच , जुना पुलच नवा दाखवला, संतप्त ग्रामस्थांनी रस्ता अडवला , डॉ.गणेश ढवळेंची मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री , ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांच्याकडे जिल्हाधिकारी बीड मार्फत ई-मेल द्वारे लेखी तक्रार ,कारवाईची मागणी
―डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर
पाटोदा:आठवडा विशेष टीम―पाटोदा तालुक्यातील नगरपंचायत हद्दीतील मौजे गितेवाडी ते पाटोदा-चुंबळीफाटा राज्यमार्ग हा १६०० मीटरचा रस्ता ,कामाची किंमत १ कोटी ९४ लाख २३ हजार रुपये, अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता , मोटार सायकल गेली तरी धुराचे लोट उठलेले दिसतात, त्यातच भर म्हणुन जुना पुल नवा न बांधताच त्यावर ३ इंच सिमेंट थर अंथरून नवा पुल दाखवण्याच्या प्रयत्नामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्ताकाम बंद पाडले.
ज्ञानेश्वर सुभाष गिते , ग्रामस्थ
मी एक सामान्य माणूस आहे, १६०० मीटरचा रस्ता ,१ कोटी ९४ लाख २३ हजार रुपये बजेट आहे याला.सिमेंट रस्ता आहे एवढ्या मे महीन्याच्या कडक ऊन्हाळ्यात या रस्त्याला पाणी सूद्धा मारले नाही, उगं २ बोटाचा थर दिलाय. गावक-यांची मागणी आहे कि काम ईस्टीमेट प्रमाणे व्हायला पाहिजे.
चांगदेव गिते ,बेरोजगारांचे नेते ,गितेवाडी
पाटोदा-चुंबळीफाटा राज्यमार्ग ते गितेवाडी हा १६०० मीटरचा रस्ता आहे,त्याला १ कोटी ९४ लाख रु बजेट असताना सुद्धा एक पुल नविन बांधता येत नाही,जुन्यापुलावरच सिमेंटचा थर अंथरुन नवा दाखवायचा प्रयत्न यांना लाज कशी वाटत नाही ?? आम्हाला ते बघवलं नाही आणि शेवटी आम्ही ग्रामस्थांनी काम बंद पाडले आहे, ईस्टीमेट प्रमाणे काम झाले नाही तर पाटोदा नगरपंचायत समोर धरणे आंदोलन करण्यात येईल.
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड
पाटोदा नगरपंचायत हद्दीतील गितेवाडी १६०० मीटर रस्त्यासाठी १ कोटी ९४ लाख रू बजेट असताना आणि निकृष्ट दर्जाचे काम कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर कोणीही लक्ष देणार नाही तसेच सिमेंट रस्त्याला जर हे महीन्याच्या कडक उन्हाळ्यात पाणी मारले नाही तर रस्ता उधडणारच.आणि जुनाच पुल नवा दाखवुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबधित शासकीय अभियंता , ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि संबंधित बोगस कामे करणा-या कंपनीचे नाव काळ्या यादित टाकून ईस्टिमेट प्रमाणे नविन रस्ता करण्यात यावा.यासाठी मुख्यमंत्री , सार्वजनिक बांधकाम मंत्री , ग्रामविकास मंत्री , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना जिल्हाधिकारी, बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपंचायत पाटोदा शशिकांत भोसले , नगराध्यक्षा सौ अनिता गणेश नारायणकर यांच्यामार्फत लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.