परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― बँक कॉलनी व परिसरातील नागरिकांना भेडसावणारा पाण्याचा प्रश्न सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून व गटनेते वाल्मिक कराड यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते कैलास फड यांनी मार्गी लावल्यामुळे नागरिकांची पाणी टंचाईची समस्या दूर झाली आहे. नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे. पाणी प्रश्न मार्गी लागल्यामुळे नागरिकांनी शब्दिक स्वरूपात आभार व्यक्त केले आहेत.
तालुक्यातील मौजे जिरेवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत बँक काँलनी व परिसराचा भाग आहे. या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भेडसावत होती. येथील नागरिकांनी कैलास फड यांच्या कडे धाव घेतली होती. नां.धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्या कानावर घालून पाणी टंचाईचा कायमस्वरूपी मिटवून बोअर मिशन पाठवून बोअर पाडून दिला. बोअरला मोठ्या प्रमाणात पाणी लागल्यामुळे धनंजय मुंडे यांनी या भागातील पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मिटविल्याबद्दल नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्यावतीने अनेक ठिकाणी गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिरेवाडी गावा अंतर्गत बँक काँलनी परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले असुन नाली सफाईसह स्वच्छता मोहीम राबवली आहे. परिसरात कोरोना रोगाची माहिती देऊन जनजागृती करण्यात आल्याचे सांगुन लाॅक डाऊन आणि संचारबंदी याचा गोरगरीब जनतेच्या जिवनावर परिणाम होऊ नये म्हणून स्वस्त धान्य दुकानांमार्फत जिवनावश्यक वस्तूंचे मोफत वितरण करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, घरातच थांबुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोनाच्या संकटात नागरिकांना पाण्यासाठी वणवण हिडावे लागत होते. मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील अनेक भागात पाणीने स्वरूप धारण केले असून नागरिकांना चटके सोसावे लागत होते. या पाणी प्रश्नाची धनंजय मुंडे यांनी दखल घेऊन एका दिवसात बोअर घेऊन मिटविला पाण्याचा प्रश्न, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बँक काँलनीतील पाण्याचा प्रश्न धनंजय मुंडे, वाल्मिक आण्णा कराड यांच्या माध्यमातून मिटल्याबद्दल नागरिकांनी आभार मानले आहेत. कैलास फड यांनी पोल खंबा व तार महावितरण कार्यालयचे आंबेडकर यांच्या सहकार्याने वीजचा प्रश्न मार्गी लावला आहे. बोअर घेऊन मोटार टाकून तसेच बँक काँलनी व परिसरात डोअर टू डोअर नळ कनेक्शन देण्याचा मानस आहे. तसेच नागरिकांच्या मदतीला नेहमीच धावून येणारे बहुआयामीनेतृत्व म्हणून कैलास फड यांची ओळख आहे. बँक काँलनीतील मागील वर्षीच्या दुष्काळाच्या परिस्थितीत ही त्यांना पाणी प्रश्न व विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. संकटात सापडलेल्या जनतेला कोणत्याना कोणत्या कारणाने मदत करणे, संकटात धावून जाण्याबरोबर लाँकडाऊनच्या काळातही मदतीला धावून जाणारे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वाल्मीक आण्णा कराड यांच्या माध्यमातून कैलास फड यांनी या भागातील कुठलाही मुलभूत प्रश्न असेल सोडवण्यासाठी कठिब्द असल्याची ग्वाही दिली आहे.
सध्या देशात टाळेबंदीचा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला. या काळात तीव्र उन्हाळ्याच्या झळामुळे लाहीलाही झालेल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या सहकार्याने कैलास फड यांनी मार्गी लावून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात व कोरोनाच्या संकटात मिटल्याने नागरिकात आनंदाचे वातावरण आहे.
0