मुंबई दि.३०:आठवडा विशेष टीम― आभाळाकडे बघून थुंकू नये नाहीतर आपलेच तोंड थुंकीने भरून जाते याची प्रचिती आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना आली असेल. त्यांनी आपल्या पेक्षा कित्येक पटीने मोठ्या आभाळा एव्हढ्या मोठया मनाच्या नेत्यावर म्हणजेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिलेल्या गो कोरोना नाऱ्याचा संदर्भ घेऊन संघर्षनायक राष्ट्रीय नेते ना. रामदास आठवले यांच्यावर टीका करण्याचा अपराध केला आणि आपलेच थोबाड रंगवून घेतले आहे.
कोरोना समोर महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार नाकर्ते ठरले आहे या सत्यपरिस्थितीकडे जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ना.रामदास आठवले यांनी केला असता त्यावर उपहासात्मक टीका करताना सचिन सावंत यांनी ना रामदास आठवले यांना राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये फिरवून गो कोरोना चा नारा बोलायला लावा म्हणजे कोरोना पळून जाईल. हे विधान म्हणजे सचिन सावंत यांच्या बालिशपणाचे द्योतक आहे. खरे तर गो कोरोना हे काही अंधश्रद्धेसाठी ना. रामदास आठवले म्हणाले नसून त्यांनी कोरोना विरुद्ध युद्ध लढणाऱ्यांसाठी प्रेरणा देणारा हा नारा दिला आहे. जगात जे जे लोक कोरोना विरुद्ध लढत आहेत त्या सर्व कोरोना वॉरीयर्स योद्ध्यांनी गो कोरोना चा नारा स्वीकारला आहे मात्र या गो कोरोना च्या नाऱ्याचे महत्व ओळखायला लढाऊ योद्धा मनात असावा लागतो. काँग्रेस च्या नेत्यांची मैदानात उतरून लढण्याची परंपरा नाही. महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि मुख्यमंत्री सर्व जण कोरोना धुमाकूळ घालत असताना मैदान सोडून घरी बसलेत.कोरोना विरुद्ध महाविकास आघाडी सरकार लढत आहे असे चित्र राज्यात दिसत नसून महाविकास आघाडी सरकार कोरोना ला घाबरून शेपूट घालून बसले आहे असे चित्र उभे राहिले आहे. सचिन सावंत स्वतः शेपूट घालून घरात बसलेत. त्यांनी स्वतः कोणत्या रुग्णालयात भेट दिली आहे का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरी कुठे भेट दिली आहे का?
महाराष्ट्रात कोरोनाची महामारी वाढत आहे. रुग्णांना उपचार मिळत नाहीत. तपासणी होत नाही. सर्वात गंभीर म्हणजे कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांचे रुग्ण उपचाराविना मरत आहेत . रक्तदाब असणारे ; हृदय विकार असणारे; तसेच पोटाचे विकार किंवा अन्य आजार असणारे तसेच ततडीने उपचारांची गरज असणाऱ्या रुग्णांना उपचार मिळत नाहीत. अनेक रुग्णांना उपचाराविना जीव गमवावा लागत आहे. अनेकांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाही. कोरोना रुग्ण सापडलेल्या घरातील लोकांची तपासणी होत नाही. त्याभागात औषध फवारणी होत नाही. राज्यात ही विदारक परिस्थिती आहे.जनतेला ही परिस्थिती माहीत आहे मात्र जनतेच्या डोळ्यांत महाविकास आघाडी सरकार खोटी आकडेवारी जाहीर करून धूळफेक करीत असल्याचे जनता जाणून आहे. ही सत्यस्थिती लपविण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते विरोधकांवर टीका करतात आणि अन्य राज्यांकडे बोट दाखवितात. पण इतरांकडे बोट दाखवून स्वतःवर असलेल्या जबाबदारीतून पळता येणार नाही.महारष्ट्रात कोरोनाला अटकाव करण्यासाठी केरळ मधून डॉक्टरांचे पथक येणार आहे हे महाराष्ट्र सरकार ला अभिमानास्पद आहे का? महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या मागण्यांकडे राज्य सरकार ने लक्ष द्यावे; पोलीसांचे कोरोना मुळे मृत्यू होत आहेत ते रोखण्याकडे लक्ष द्या. सचिन सावंत यांची अभ्यासाची पाटी कोरी आहे की ये झोपेचे सोंग घेत आहेत?
सर्व जगासमोर चीन हे नाव नको नकोसे झाले आहे. तुमच्या नावात ‘स’ काढून टाकला तर ‘चीन’राहतो. तसे राहु नका . नावात ‘स’ म्हणजे सत्य आहे तो ‘स’ सोडू नका नाहीतर फक्त चीन व्हाल तुम्ही. सत्य चा स सोडू नका आणि उगाच मोठया नेत्यांवर टीका करू नका.चीन सारखे वागू नका ‘सचिन’ सारखे चांगले वागा.
केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले तर स्वतः मैदानात उतरून जनतेची सेवा करीत आहेत पण सचिन सावंत तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना रुग्णालयांना भेटी देण्याची आवाहन करा.. तुमचा काँग्रेस पक्ष जसा महाविकास आघाडी मध्ये कुचकामी ठरला आहे तसेच तुम्ही ही काँग्रेस मध्ये कुचकामी ठरले आहात.
प्रवक्ते म्हणून पक्षाची बाजू मांडताना पक्षाची प्रतिमा अजून खराब करण्याचे काम तुम्ही केले असल्याने तुम्हाला काँग्रेस मध्ये कधीही आमदारकी मिळू शकत नाही हे नक्की. त्यामुळे काँग्रेस पक्षातच तुम्ही दुर्लक्षित आणि उपेक्षित राहणार आहात.तुमचे डिपॉझिट गुल झाले.काँग्रेस मध्ये कितीही गळे काढले तरी तुम्ही आमदार होऊ शकले नाहीत. लोकनेते रामदास आठवले यांनी काँग्रेस सोबत युती तोडल्यापासून काँग्रेस ची सत्ता गेली. आता राज्यात सत्तेत असून नसल्यासारखी परस्थिती आहे. त्यामुळे काँग्रेस चे काही नेते आठवलेसाहेबांविरुद्ध गरळ ओकत असतात. तशीच गरळ ओकण्याचे काम स ‘चिन’ सावंत यांनी केले आहे.
ना.रामदास आठवले हे महाराष्ट्रात 5 वर्षे कॅबिनेट मंत्री ; तीन वेळा लोकसभा खासदार आणि दोन वेळा राज्य सभा खासदार आणि आता दुसऱ्यांदा भारत सरकार मध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. काँग्रेस ; राष्ट्रवादी काँग्रेस;शिवसेना या तिन्ही पक्षांना रामदास आठवलेंच्या नेतृत्वाचा करिष्मा माहीत आहे. स ‘चिन’ सावंत तुमच्या समोर आठवलेसाहेब आभाळाएव्हढे मोठे नेते आहेत त्यांच्या कडे बघून टीका करण्याचा प्रयत्न कराल तर तोंडघशी पडाल. हे लक्षात ठेवा.
―हेमंत रणपिसे