नांदेड (प्रतिनिधी) दि.०९: मध्य रेल्वे ने कळविल्या प्रमाणे मुंबई विभागातील कल्याण आणि टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे पुलाच्या कामाकरिता रविवारी दिनांक १०/०२/२०१९ रोजी सकाळी १० ते १४.१५ दरम्यान ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे उद्या दिनांक १० फेब्रुवारी रोजी गाडी संख्या १२०७१ दादर ते जालना आणि गाडी संख्या १२०७२ जालना ते दादर जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आह. प्रवाश्यांना होणाऱ्या असुविधे बद्दल रेल्वे प्रशासन खेद ब्यक्त करीत आहे.
दक्षिण पूर्व रेल्वे ने कळविल्या प्रमाणे दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये विविध सुरक्षा आणि रेल्वे रूळ दुरुस्ती करीत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत . त्यामुळे गाडी संख्या १२७६७ नांदेड ते सतरागच्ची आणि गाडी संख्या १२७६८ सतरागच्ची ते नांदेड साप्ताहिक रेल्वे च्या तीन फेऱ्या रद्द करण्यात आला आहेत. त्या पुढील प्रमाणे:गाडी संख्या १२७६७ नांदेड ते सातरागच्ची साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक ११, १८ आणि २५ फेब्रुवारी २०१९ रोजी रद्द करण्यात येत आहे.गाडी संख्या १२७६८ सातरागच्ची ते नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक १३, २० आणि २७ फेब्रुवारी २०१९ रोजी रद्द करण्यात आल्या आहेत.