औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

औरंगाबाद: सोयगावला वादळी वाऱ्याचा सहा तासांचा तडाखा , विजेच्या पोलसह झाडे उन्मळून पडली

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्याला बुधवारी रात्री वादळी वार्याने सहा तासांचा जोरदार तडाखा दिल्याने तालुक्यात गाव आणि शेती पंपांना वीजपुरवठा करणारे एल.टी लाईनचे तब्बल दहा वीज पोल कोसळले,वादळी वार्याचा वेग वाढताच महावितरणच्या वीज मंडळाने सर्वच उपकेंद्रांच्या फिडरला लॉकडाऊन केल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.मात्र वीज पुरवठा बंद करण्यात आल्याने तालुकाभर अंधारातच वादळी वारे वाहत होते.
मुंबईला धडकलेल्या निसर्ग वादळी वाऱ्याने दिशा बदलवून उत्तर महाराष्ट्राकडे दिशा वळविल्याने जळगाव जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते,जळगावच्या सीमेवर असलेल्या सोयगाव तालुक्यालाही या निसर्ग वादळी वार्याचा धोका असल्याचे सांगण्यात येत असतांना मध्यरात्री अचानक सोयगाव तालुक्यात वादळी वारे धडकल्याने सहा तास या वादळाने झंजावात घातला यामध्ये वीजपोल आणि मुख्य वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या तुटून पडल्याने सोयगाव तालुक्याच्या खंडित वीज पुरवठ्याचे गुरुवारी दिवस महावितरणच्या पथकाकडून दुरुस्तीचे कामे हाती घेतले होते.धडकलेल्या वादळात कोणतीही जीवितहानी झालेली नसून मात्र रात्रभर तालुकावासीयांचा जीव मुठीत होता.काही कच्च्या घरांवरील पत्रे उडाली तर काही गावात वादळाचा वेग जोरात असल्याने रात्रीच्या अंधारात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  फळबागांना फटका-

  धडकलेल्या वादळी वाऱ्याने सहा तासात फळबागांना मोठा फटका दिला असून फळबागा झाडांसह कोसळल्या असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.खरिपाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या पाचवीला नुकसान हा शब्द पुंजला असल्याचे या नुकसानीवरून स्पष्ट झाले आहे.

  सोयगाव तालुका अंधारात-

  वादळी वाऱ्याचा वेग वाढताच सतर्क असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सर्वच वीज उपकेंद्रातून तालुक्याचा वीज खंडित केली असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.वादळी वाऱ्याच्या तडाख्यात अनेक भागात तुटलेल्या मुख्य वीज पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांचे जोडणी करण्याचे काम महावितरणच्या वीज मंडळाने गुरुवारी युद्धपातळीवर हाती घेतले होते.त्यामुळे काही भागात सायंकाळ पर्यंत वीज पुरवठा सुरळीत होणार असल्याचे सहायक अभियंता अभिजित गौर यांनी सांगितले.

  सोयगाव तालुक्यात दहा वीजपोल कोसळले ,पंधराच्या वर झाडांना जमिनीवर लोळविले-

  अचानक रात्री धडकलेल्या सहा तासांच्या वादळी वाऱ्यात सोयगाव तालुक्यात गाव आणि शेतीच्या पुरवठा करणाऱ्या दहा वीजपोल रात्री कोसळून पडले होते महावितरणचं कर्मचाऱ्यांनी गुरुवारी या कोसळलेल्या वीज पोलला पुन्हा बसविण्यचे काम हाती घेतले आहे.या वादळात मोठ मोठी दहाच्या वर झाडे उन्मळून पडली असून काही झाडांच्या कोसळण्यामुळे वीज वाहिन्या तुटल्या आहे.यामध्ये सोयगाव भागात चार आणि बनोटी भागात चार आणि इतर दोन असे दहा विजपोल कोसळले आहे.


  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.