पाचोरा (ज्ञानेश्वर पाटील) :पुष्पाताई काळे यांच्या वाढदिवसा निमित्त दातांचे व डोळ्याचे रोग शिबीर आयोजित करण्यात आले होते.सोयगाव येथे उदासी बच्ची बाई मेमोरियल ट्रस्ट व जि प सदस्या पुष्पाताई काळे युवामंच सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने डोळ्याचे व दातांचे रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते व रामपूरवाडी निंबायती ,कांकरळा ,लेनापूर इत्यादी ठिकाणी मतदारसंघात वाढदिवसानिमीत्त वही ,पेन रंगीत खडू चे वाटप करण्यात आले.या वेळी सत्कार मुर्ती सौ पुष्पाताई काळे यांच्या तालुक्याच्या वतीने रवींद्र पाटील यांनी सत्कार केला अध्यक्ष स्थानीं नगर पंचायत मा.नगराध्यक्ष कैलास काळे हे होते.अध्यक्षीय भाषणात कैलास काळे यांनी ताईच्या कार्याचा उल्लेख केला या वेळी उदासी बच्ची बाई उदासी ट्रस्टचे डॉ.मूलचंद उदासी ,डॉ शरद पवार ,डॉ विक्रम उदासी ,युवराज पाटील हे उपस्थित होते या वेळी तालुक्यातील जवळपास ३७० लोकांनी डोळे व दातांच्या शिबिराचा लाभ घेतला यावेळी नगराध्यक्ष कैलास काळे प.स सदस्य संजीवन सोनवणे, बद्री राठोड ,राजू पाटील, वसंत बनकर वकील राजेश गिरी ,भावी नगरसेवक मंगेश सोहनी राजेंद्र जावळे ,महाजन सर ,सुनील गुजर, सुनील गावंडे ,दादाराव झोड ,संतोष गव्हाले ,राजू झोड, कादिर शहा, योगेश मानकर ,संजय मोरे ,शांताराम देसाई ,सुनील ठोंबरे, शिवाजी दैड इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ.निलेश गाडेकर, सुनील साळुंखे, राजेंद्र राठोड, भरत औरंगे ,देवा जोहरे, शिवाजी दौड आदींनी परिश्रम घेतले.
0