बीड दि.२२:आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्यातून दि. २१ रोजी कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी पाठविलेले स्वॅब नमुन्यांपैकी ३ व्यक्तींचे अहवाल आज (Inconclusive) प्राप्त झाले आहेत.
दि. २२ रोजी पाठविलेले ४२ स्वॅब नमुन्यांपैकी १ स्वॅब नमुने अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून ३५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ६ व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिली आहे.