१६ व १७ फेब्रुवारीला पुण्यात वेदना मुक्ती साठी “पेनेक्स” आयोजित शस्त्रक्रिया विरहित पेन मॅनेजमेंट शिबीर

पुणे दि.१२ (प्रतिनिधी):आजकाल बदलत्या जीवनशैलीत बैठ्या कामावर दिला जाणारा भर, आधुनिक साधनांचा(मोबाईल इत्यादी) वापर तसेच व्यायामाचा अभाव यामुळे काही व्याधींचं प्रमाण वाढीस लागलं आहे.तर ह्याकारणांमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी “पेनेक्स” पेन मॅनेजमेंट क्लिनिक आयोजित शस्त्रक्रिया विरहित पेन मॅनेजमेंट शिबीर १६ व १७ फेब्रुवारी २०१९ रोजी पुणे येथे विविध ठिकाणी होणार असल्याची माहिती पुणे येथील सुप्रसिद्ध डॉ काशिनाथ बांगर यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.या शिबिरात पुण्यासह अन्य जिल्ह्यातील रुग्ण येणार असल्याचे त्यांनी सांगितले.याआधीही पेनेक्स ने अशी शिबिरे घेतली आहेत व यशस्वी रित्या पार पडली आहेत. रुग्णांच्या सोयीनुसार पुण्यात १.पेनेक्स (स्पाईन रोड मोशी) २.पेनेक्स (आपटे रोड डेक्कन) या दोन ठिकाणी ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
डोकेदुखी सह गुडघेदुखी,मान पाठ कंबर दुखी, कर्करोगामुळे होणाऱ्या वेदना ,सायटिका आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी शिबिरात तपासणी होणार आहे.तरी या शिबिराचा पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन “पेनेक्स” टीम ने केले आहे.
या शिबाराचा लाभ घेण्यासाठी
रुग्णाची नाव नोंदणी करण्यासाठी ८३९०४४२२६६ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा http://www.painex.org या संकेतस्थळावर भेट द्यावी.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.