अदखलपात्र गुन्ह्यांपासून वाचविण्यासाठी केली लाचेची मागणी
गोंदिया दि.१९:बिंबिसार शहारे― हल्ली कोणाचा कोणावरच विश्वास राहिलेला नाही,सामान्य जनतेला अधिकारी-कर्मचारी जुमानत नाही,सामान्य जनतेकडून चिरीमिरी घेणे हा प्रकार नीत्याचाच होत आहे मात्र ज्यांच्यावर जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे असे अधिकारी आपल्याच कर्मचाऱ्याकडून लाच घेताना मागेपुढे बघत नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेची किती पिळवणूक होत असेल हे या प्रकरणावरून आता समोर आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन येथे एका पोलीस कर्मचाऱ्यावर अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा नोंद आहे त्या गुन्ह्यांचा तपास आरोपी प्रदीप मधू अतुलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक व सह आरोपी उमेश ज्योतिराम गुटाळ पोलीस उपनिरीक्षक यांनी तक्रारदारावर नोंद असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यातून वाचवून बाल अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होण्यापासून बचाव करण्यासाठी तक्रारदार आकडे पस्तीस हजाराची मागणी केली त्याबदल्यात बाल अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ न देण्याचा व समझोता करून निपटारा करण्याच्या आमिषाने लाचेची मागणी केली मात्र तक्रारदाराला देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंध विभागाला सर्व परिस्थिती सांगितले त्यावरून 19 जून 2020 रोजी पोलीस स्टेशन ग्रामीण गोंदिया येथे सापळा रचून कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान मुख्य आरोपी प्रदीप मधु अतुलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी स्वतः लाचेची रक्कम स्वीकारली त्यामुळे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. सदरची कामगिरी रश्मी नांदेडकर पोलीस अधीक्षक राजेश दुलार अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनात रमाकांत कोकाटे, पोलीस उपअधीक्षक शिवशंकर जुमडे विजय खोबरागडे, पोलीस हवालदार प्रदीप तोरसकर, राजेश शेंद्रे रंजीत दिशेन, दिगंबर जाधव ई. केली