परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

निर्सगाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण सोबत वृक्ष संवर्धन गरजेचे― सरपंच डी.एस.राठोड

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― पर्यावरण समतोल बिघडल्याने प्रत्येकाने गावोगावी वृक्ष लागवड करण्यासोबतच वृक्षसंवर्धन करणे निंतांत गरजेचे आहे यामध्ये सर्व सहभाग महत्त्वाचा आहे. तालुक्यातील सर्व गावांच्या नागरिकांनी पाच तरी वृक्ष लागवड करून निर्सगाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण सोबत वृक्ष संवर्धन करणे गरजेचे बनले असल्याचे आवाहन लमाणतंडा ग्रामपंचायत सरपंच डी.एस.राठोड यांनी नंदागौळ रोडवरील वसंतनगर वनविभागाच्या घनवृक्ष लागवडीस सदिच्छ भेट दिली त्यावेळी केले. यावेळी वनरक्षक वैजनाथ दौंड यांनी सर्व घनदाट वृक्ष लागवडीची माहिती दिली.
परळी तालुक्यातील वसंतनगर येथील डोंगराच्या माथ्यावरील वनविभागाच्या घनदाट वृक्ष लागवडीस सरपंच डी.एस.राठोड यांनी बुधवार, दि.24 जुन 2020 रोजी सदिच्छा भेट दिली. कोरोनाच्या संकट काळातील टाळेबंदीत वनविभागाने जोपासना केलेली वृक्ष आज दहा ते बारा फुटांचे जोपासना केली आहे. वनविभागाने अथक परिश्रम घेऊन दहा महिन्यात अशी घनदाट वृक्षांचे जंगल तैयार केले आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सरपंच राठोड यांनी मनापासून कौतुक केले. परळी जवळील वनविभागानेडोंगरमाथ्यांनी व्यापलेल्या वन विभागाची जमीन म्हणजे वर्षभर उघडी,दगडगोट्यांनी भरलेली असायची मागील काही वर्षात परळीच्य वनविभागाने घेतलेल्या मेहनतीमुळे अनेक डोंगरमाथे हिरवीगार झालेली आहेत या डोंगरमाथ्यांना हिरवाई देण्यासाठी वन विभागातील अनेक अधिकारी,कर्मचार्यांचे मोठे योगदान देत मोठे घनदाट वृक्ष उभे केले आहे. या परिसरात वृक्षांचे विविध प्रकारचे रोपांची लागवड करून चांगल्या प्रमाणात जोपासना केली आहे. वनविभागाच्या सर्व टिमचे कार्य कौतुकास्पद असल्याचे राठोड म्हणाले. नंदागौळ रस्त्यावरील डोंगरमाथ्यावर घनदाट जंगल उभे राहत आहे.त्यांच्या या कार्यामुळे परळीच्या वनक्षेत्राला हिरवी झालर प्राप्त झाली आहे.
आज वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन काळाची गरज बनली आहे ही तर लोकचळवळ व्हावी म्हणून सर्वांनी आपआपल्या परीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी जास्त झाडे असतात त्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो यामुळे वृक्ष लागवडीसोबत वृक्ष संवर्धन व वृक्ष संगोपनावर भर द्यावा,तसेच परळी तालुक्यातील सर्व. नागरिकांनी व सरपंचांनी आपल्या गावच्या सर्वागिण विकासाबरोबर पर्यावरणाचा विकास होणे ही महत्वाचे असते म्हणून किमान पाच तरी वृक्ष लागवड करून निर्सगाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण सोबत वृक्ष संवर्धन गरजेचे बनले असल्याचे आवाहन सरपंच डी.एस.राठोड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button