सोयगाव,ता.१७(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):जरंडी ता.सोयगावला पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जरंडी भाजपा कार्यालयाजवळील बसस्थानक परिसरात हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकात्मतेचे दर्शन घडवीत दहशतवाद्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून जाळपोळ केली.
पाकिस्तानातून दहशतवाद्यांनी भारतीय सेनादलाच्या ४२ जवानांना ठार मारल्याच्या कृत्याचा जरंडीला तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला होता.यावेळी हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्रित येत या घटनेचा निषेध व्यक्त करून तासभर घोषणा दिल्याने जरंडी परिसरात संताप व्यक्त करण्यात येत होता.या निंदनीय घटनेचा मुस्लीम बांधवांनीही तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे,यावेळी पंचायत सदस्य संजीवन सोनवणे,दिलीप पाटील,मधुकर पाटील,बालू तात्या,एकनाथ चौधरी,अमृत राठोड,शेख पाशु,शेख लुख्मान,राहुल चौधरी,शांताराम पाटील,विकास गोरे,ईश्वर मोरे,दिलीप गाडेकर,भिवा चव्हाण,इस्माईल पटेल,सारंग सवाई,संतोष सोनवणे,आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.