ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमी

पंढरपूरला येणाऱ्या पादुकांसोबत १०० वारकऱ्यांना परवानगी द्या―वारकरी सेवा संघाची याचिका

मुंबई दि.३०:आठवडा विशेष टीम― यंदा कोरोना आणि टाळेबंदीचे संकट आषाढातल्या पंढरपूरच्या वारीवर आहे. मात्र तरीही किमान १०० वारकऱ्यांसह माऊलींची पालखी पंढरपूरात घेऊन जाण्यास परवानगी द्या, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्यावर आज दि.३० मंगळवारी तातडीने सुनावणी पार पडणार आहे.

वाखरी ते पंढरपूर या अंतिम ६ किलोमीटरच्या मार्गात १०० वारकऱ्यांच्या उपस्थितीत दिंडी काढण्यास परनावगी देण्यात यावी, अशी मागणी करणारी रिट याचिका वारकरी सेवा संघाने अॅड. मिहिर गोविलकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

नगर प्रदक्षिणा, स्नान आणि गोपाळकाला सोबतच पौर्णिमेपर्यंत मुक्कामास राहण्यासाठीची परवानगी देण्यात यावी अशीही मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.