सुशोभित परिसरासाठी हवे वृक्षसंवर्धन-कुलगुरू डॉ.अशोक ढवण
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत महाविद्यालयांच्या प्रक्षेञावर “आनंदघन वन लागवड अंतर्गत” वृक्षरोपांच्या लागवडीचा शुभारंभ गुरूवार,दिनांक 2 जुलै रोजी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ.अशोक ढवण यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना कुलगुरू डॉ.अशोक ढवण (परभणी) म्हणाले की,कृषि महाविद्यालयांचा परिसर हा वृक्षसंवर्धनातून सुशोभित करण्यात येईल.तर कृषि महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 1 जुलै ते 7 जुलै 2020 या कालावधीत “कृषी संजीवनी सप्ताह” आयोजित केला असून या अंतर्गत थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत.अंबाजोगाई कृषि महाविद्यालय प्रक्षेञावर,रस्त्याच्या दुतर्फा आणि विद्यार्थी वसतीगृहाच्या सभोवताली अंबा,चिंच,जांभुळ,अंजन करंज, गुलमोहर,वड,पिंपळ,कदंब इत्यादी प्रजातींची 3 हजार वृक्षरोपांची लागवड केली जाणार असून पहिल्या टप्प्यात 500 वृक्षरोपांची लागवड होणार अशी माहिती सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी दिली.यावेळी विभागीय कृषि सहसंचालक डाॅ.दिनकर जाधव,सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे,जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख,माजी सरपंच वसंतराव मोरे,अॅड.अनंतराव जगतकर,सुरेश खंदारे,
प्रा.अरूण गुट्टे,अॅड.तारेख अली उस्मानी,संजय वाघमारे,भगवानराव ढगे,ज्येष्ठ प्रा.डॉ.अरुण कदम डॉ.भीमराव कांबळे,डॉ.प्रताप नाळवंडीकर,डॉ.दिपक लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.योगेश वाघमारे,डॉ.नरेंद्र कांबळे,प्रा.सुहास जाधव,डॉ.नरेशकुमार जयावार,प्रा.सुनिल गलांडे,डॉ.विद्या तायडे,मन्मथ बेरकेले,स्वप्निल शिल्लार,इरफान सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले.उपस्थितांचे आभार डॉ.बसलींगआप्पा कलालबंडी यांनी मानले.