पाचोरा (ज्ञानेश्वर धोंडू पाटील): दि.19/2/2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित्त साधून जलयुक्त शिवार या योजने मधून भोजे व चिंचपुरे या दोन गावातील नदीवर 25 ते 30 वर्ष जुना पडलेला बंधारा दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन आज मा.श्री. मधु भाऊ काटे, जि. प.सदस्य पिंपळगांव शिंदाड गट यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मा. श्री. परेश अशोक पाटील, तालुका सरचिटणीस,भारतीय जनता युवा मोर्च्या, पाचोरा श्री.विजय कडू पाटील, माजी प. स. सदस्य, पाचोरा,मा. सौ.निर्मला राजेंद्र हिवाळे सरपंच, ग्राम पंचायत, भोजे मा.सौ.शोभा विनोद पाटील सरपंच, ग्राम पंचायत, चिंचपुरे,यशवंत पवार, डॉ. शिवाजी पाटील निलेश उभाळे, शीतल पाटील, बाळू पाटील भोजे, बाळू पाटील चिंचपुरे,अनिल महाजन, विनोद महाजन, व मिलिंद पाटील यांच्या प्रमुख उपस्तीत हा कार्यक्रम पार पडला. सदर कामसाठी श्री मधुभाऊ यांच्या विशेष प्रयत्नाने रु.28 लाख मंजूर झाले. या बंधारा दुरुस्तीची मागणी ही या दोन्ही गावातील शेतकऱ्यांची बऱ्याच दिवसांची होती असे तेथील शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. या कामामुळे त्या नदीला व जवळच्या विहिरींना पुनर्जीवन मिळणार आहे.
0