बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणविशेष बातमीशिरूर तालुकासामाजिक

जलकुंभा जवळील अतिक्रमणे हटवुन नवीन जलकुंभाची निर्मिती करणार― आ.सुरेश धस

शिरुर कासार:आठवडा विषेश टीम― शहराला अविरतपणे पाणीपुरवठा करत असलेला आणि जवळपास चाळीस वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला जलकुंभ अखेरच्या घटका मोजत असून त्याचा स्लॅप पूर्णपणे कुचकामी झाला असं कधी कोसळेल सांगता येणार नसल्याने नविन जलकुंभाची निर्मिती करणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले आहे. शिवाय जलकुंभाजवळील अतिक्रमणे तात्काळ हटवून त्या ठिकाणी व्यापाऱ्यांसाठी अद्ययावत स्वरूपाचे शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार होणार असून या कॉम्प्लेक्समुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे.तत्कालीन सरपंच कांतीलाल देसारडा यांच्या काळात जवळपास चाळीस वर्षापूर्वी गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अंशी हजार लिटर साठवण क्षमतेचा जलकुंभ तयार करण्यात आला होता.आजघडीला गावाचे रूपांतर शहरात झाले असून तेरा हजार लोकसंख्येला सदरील जलकुंभाचा आजही आधार असलेला दिसत आहे.नव्याने तयार करण्यात येणाऱ्या जलकुंभाची पाणी क्षमता दोन लक्ष लिटर असून या जलकुंभामुळे शहरवासीयांचा पाणीप्रश्न कायमचा मिटण्यास मदत होणार आहे.

जलकुंभाचे आयुष्य संपले!

चाळीस वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या जलकुंभाचे आयुष्य संपले आहे.आजघडीला हा जलकुंभ शेवटच्या घटका मोजत असून ठिकठिकाणी तडे गेले आहेत.शिवाय टाकीमध्ये वापरलेले गज,लोखंड पूर्णपणे गंजून उघडे पडले आहे.सदरील जलकुंभ कधीही खाली येऊ शकतो त्यामुळे हा जलकुंभ जमीनदोस्त करून नवीन जलकुंभ प्रस्तावित करण्यात आला आहे.

अद्ययावत शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी

जलकुंभ परिसरात असलेली अतिक्रमणे हटवून व्यापारी लोकांसाठी नव्याने शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करण्यात येणार आहे.सदरील काम बीओटी तत्वावर होणार असून या कॉम्प्लेक्समुळे शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे उपनगराध्यक्ष प्रकाश देसारडा यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button