#Lockdown औरंगाबाद: शासनाच्या परवानगीने सोयगाव तालुक्यात १३७ मजूर दाखल

सोयगाव,दि.३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
परराज्यात आणि जिल्ह्यात अडकलेल्या सोयगाव तालुक्यातील १३७ मजुरांनी रविवारी अखेरीस घर गाठल्याने सुटकेचा श्वास सोडला आहे.परंतु या ठिकाणीही पुन्हा त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना दक्षता म्हणून १३७ मजुरांना आरोग्य विभागाने १४ दिवस होमकोरोटाईन केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनी दिली.
परराज्यात आणि जिल्ह्यात महिनाभरापासून अडकलेल्या मजुरांना अखेरीस शासनाने संबंधित ठिकाणावरून त्यांच्या निवासस्थानी जाण्याची परवानगी दिली होती.यासाठी समन्धित ठिकाणावर आॅनलाईन अर्ज करून सदरील अर्ज जाण्याच्या ठिकाणच्या जिल्हाधिकार्यांना पाठवून पडताळणी झाल्यानंतरच त्यांना संबंधित ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.या परवानगीने सोयगाव तालुक्यात विविध ठिकाणावरून १३७ मजूर सोयगाव तालुक्यात दाखल झालेले असून कोविड-१९ च्या हॉटस्पॉट मधून आलेल्या मजुरांना आरोग्य विभागाने पुन्हा तपासणी करून त्यांना गावाबाहेरच शेतात होमकोरोटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे.

सोयगाव तालुक्यातील विविध ठिकाणावर कामांसाठी गेलेल्या १३७ मजुरांची परवानगीची जिल्हाधिकारी औरंगाबाद यांचेकडे पडताळणी झाल्यावरून सोयगाव तालुक्यात या माजुरांनिया खेरीस घर गाठले,परंतु स्थानिक ठिकाणीही त्यांच्या नशिबी पुन्हा होमकोरोटाईन हाच शब्द राहिला आहे.त्यामुळे पुन्हा १४ दिवस त्यांना बंदिस्त राहावे लागणार आहे.