संतोष गर्जे यांना जी युवा पुरस्कार मिळाल्याने बीड जिल्हा टायर पम्चर युनियनच्या वतीने सत्कारीत
आठवडा विशेष|प्रतिनिधी
गेवराई दि २८: सहारा अनाथलयाचे माय बाप संतोष गर्जे यांना जी युवा पुरस्कार मिळाल्याने त्यांचा बीड जिल्हा टायर पम्चर युनियनच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यकमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अंकुश आतकरे हे अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले कि, आम्हचा संपुर्ण पत्रकार संघ सदैव संतोष गर्जे व त्यांच्या सहारा अनाथलयाच्या अडी अडचणीला धावून जावून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असे सुतवचण कार्यक्रम प्रसंगी दिले.
पुणे येथील जी युवा पुरस्कार हा गेवराई येथील सहारा अनाथलयाचे संतोष गर्जे यांना मिळाल्याने दि. २७ जानेवारी रोजी सहारा अनाथलयात बीड जिल्हा टायर पम्चर युनियनने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अंकुश आतकरे लाभले होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. अब्बासभाई होते. यावेळी पृथ्वीचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पुढे बोलतांना अॅड. अब्बासभाई म्हणाले कि, बीड जिल्हा टायर पम्चर युनियने सहारा अनाथलयांच्या मुलांना खावू वाटप करुन अनाथलयाचे प्रमुख संतोष गर्जे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात मला बोलावले हे माझे परमभाग्य मी समजतो व या संघटनेचा हा हाती घेतलेला उपक्रम कौतुकस्पद आहे असे ते म्हणाले. यावेळी बीड जिल्हा टायर पम्चर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख मकसुद यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर यावेळी टायर पम्चर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर अण्णा, टिपु सुलतान संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष अमजेद भाई, गेवराई तालुका युवा मंचचे अध्यक्ष वाजेद बागवान, टायर पम्चर संघटनेचे गेवराई ता. अध्यक्ष राम धोतरे, शहराध्यक्ष शेख कौसर, मुसिर पटेल सह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे बहारदा सुत्रसंचालन पत्रकार विनायक उबाळे यांनी तर अभार शेख मकसुद यांनी मानले.
हा माझा सन्मान नसुन समस्त गेवराई करांचा सन्मान आहे – गर्जे
पुणे येथे जो मला जी युवा पुरस्कार मिळाला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा सन्मान नसुन, गेवराई करांच्या आर्शीवादाने मला मिळाले सन्मान आहे. असे सहारा अनाथलयाचे माय बाप समजले जानारे संतोष गर्जे यांनी मनोगत व्यक्त केले.