नवी दिल्ली:आठवडा विशेष टीम― युपीतील रामपूरमध्ये ६ मे रोजी एका ६ वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करत हत्या करण्यात आला होती. या घटनेतील फरार आरोपीला पकडताना झालेल्या चकमकीत रामपूरच्या एसपी नी दोन्ही पायावर गोळ्या घालत पकडले आहे. आरोपीला गोळ्या घालत पकडल्यानंतर एसपी अजय पाल शर्मा यांच्यावर सोशल मोडिया सह सर्व स्थरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान यानंतर जखमी आरोपी नाजिलला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रामपूरमधील एका सहा वर्षाच्या चिमुरडीचे ६ मे रोजी अपहरण झाले होते. अपहरण करणाऱ्या नाजिलने त्या मुलीची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणामध्ये सिव्हील लाइन पोलीस मागील दिड महिन्यापासून नाजिलच्या शोधात होते.दरम्यान या चिमुरडीचा मृतदेह आढळून आल्याने पोलीसांच्या कार्यप्रणालीवर टीका केली जात होती. यानंतर एसपी अजय पाल शर्मा यांनी नाजिलला शोधण्यासाठी काही पथकं नियुक्त केली होती.
पोलिसांनी आरोपी पकडण्यासाठी ट्रेस केले. मात्र यावेळी आरोपी आणि पोलिसांमध्ये चांगलीच धरपकड झाली. यावेळी एसपी अजय पाल शर्मा यांनी नाजिलच्या दोन्ही पायाच्या गुडघ्यांवर गोळ्या झाडल्या आणि त्याला पकडले.
या घटनेच्या संदर्भात ७ मे रोजी रामपूर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपास करत असताना पोलिसांना या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यानंतर आरोपीचा ट्रेस करत पोलिसांनी त्याला शोधले मात्र यावेळी पोलीस आणि आरोपीमध्ये जोरदार चकमक झाली. यावेळी आरोपीच्या दोन्ही पायांवर गोळ्या मारल्या आणि त्याला अटक केल्याचे अजय पाल शर्मा यांनी सांगितले.