परळी:आठवडा विशेष टीम― गेल्या तीन वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग परळी पिंपळा ते अंबाजोगाई रस्त्याचे दीडशे कोटी चे काम चालू होते कामाचा ठावठिकाणा नसताना पस्तीस कोटी रुपयांचे बिल दिले तशी तक्रार काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांनी शासनाकडे केल्यामुळे सर्व स्तरावर चौकशी सुरू झाली या चौकशीमध्ये गुत्तेदार व राजकीय नेत्यांच्या विनंतीवरून तीन महिने मुदतवाढ मिळाली परंतु तीन महिन्यात काम न पूर्ण झाल्यामुळे वसंतराव मुंडे यांनी दिनांक 3/9/ 2019 ला शासनाकडे पत्र देऊन कामासंदर्भात दिनांक 30 सप्टेंबर 2019 ला आदेश कार्यवाही करून अहवाल सादर करा तात्काळ शासनाकडून माहिती सादर होताच परळी रस्त्याचे काम रद्द झाले नव्याने टेंडर AGC RSBIPL JVया कंपनी ला मिळाले आहे अशी माहिती वसंतराव मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय नाशिक विभाग भारत सरकार यांनी पञकारा सांगितले बोगस कामाची गुणवत्ता नाही रोज जाण्या येणाऱ्या प्रवाशांना खूप मोठा त्रास होतो सर्व रस्ता खोदून टाकल्यामुळे वाहन चालवणे अवघड होते व अपघाताचे प्रमाण वाढले आहे धूळ मोठ्या प्रमाणात उडत असल्यामुळे अनेक प्रवाशांना रोग झाले असून अपघातही झाले आहेत या सदर बाबीचा शासनाने काँग्रेस नेते वसंतराव मुंडे यांच्या तक्रारीची दखल घेऊन रस्त्याचे काम रद्द केले 8 कंपनी ने नव्याने टेंडर भरले होते त्यामध्ये ए जी सी आर आर एस बी आय पी एन जे व्ही या कंपनीस 99कोटी 99लाख 99 हजार रुपयात बिलो टेंडर मिळाले आहे सहा महिन्याच्या आत कंपनीस काम करून देण्याची शासनास हा मी दिलेले आहे अशी माहिती पत्रकारांना काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांनी दिली आहे.
0