ब्रेकिंग न्युज

सिताफळ फळपीक विमा योजनेतून वगळले..! ; सिताफळाला विमा योजनेत समाविष्ट करण्याच्या मागणीचे सोयगावला निवेदन

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― शासनाने फळपिक विमा योजनेतून सीताफळ वगळले आहे.सीताफळ हे फळ असून देखील विमाकवच मिळत नसल्याने सीताफळ उत्पादक शेतकरी नाराज झाले असून सोयगांव येथील शेतकऱ्यांनी सीताफळाचा फळपिक विमा योजनेत समावेश करण्याबाबत कृषि विभागाला निवेदन दिले आहे.
सोयगांव तालुक्यात मोठ्या प्रमाणात सीताफळ लागवड झालेली आहे.काहीं शेतकऱ्यांनी वीस वर्षापूर्वी सीताफळ लागवड केली आहे त्यांनंतर दरवर्षी शेतकरी सीताफळ लागवड करीत आहे.कमी पाण्यात , कमी खर्चात व हलक्या जमिनीत येणाऱ्या सीताफळ लागवडीकडे शेतकरी वळू लागले आहे.परंतु फळधारणा होत असतांना पाऊस न पडल्यास किंवा विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास नुकसान होऊन आर्थिक फटका बसतो अशा वेळी विमाकवच असल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळतो परंतु इतर पिकांप्रमाणे शासनाने सीताफळाला पिकविमा योजनेत समाविष्ट केले नाही.त्यामुळे शेतकरी नाराज झाले आहे.सीताफळाचा विमा योजनेत समावेश करावा या मागणीचे निवेदन सोयगाव येथील अरुण सोहनी , विनोद सोहनी , गणेश आगे , सुनिल रोकडे , डॉ ज्ञानेद्र पायघन ,राजू दुतोंडे , भास्कर चौधरी यांनी तालुका कृषि कार्यलयात दिले विभागाचे दिपक पाटील , देशपांडे , विनोद कायस्थ यांनी हे निवेदन स्वीकारले.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.