पाटोदा:नानासाहेब डिडुळ (उपसंपादक)―
दिनांक ५/७/२०२० रोजी गुरुपौर्णिमे निमित्त सद्गुरु च्या दर्शनासाठी श्री लक्ष्मीकांत रंगनाथराव मुळे वय ७१ वर्ष बीड ते उमापुर ६० किलो अंतर सायकलवर जाऊन घेतले सद्गुरूंचे दर्शन.
बीडमध्ये लॉक डाऊन असल्यामुळे कुठलेही वाहन वाहतूक चालू नाही. व टू व्हीलर गाडीला पेट्रोल देखील न मिळाल्यामुळे सद्गुरूच्या दर्शनाच्या तळमळीने त्यांनी सायकलवर जाण्याचा निर्णय घेतला व पूर्ण केला ,माणसाची इच्छाशक्ती जबरदस्त असली की जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही, इच्छा तिथे मार्ग या म्हणीप्रमाणे मार्ग मिळतो. उमापूर या गावी दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरी होते सर्व भक्त सद्गुरू नाथांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येथे एकत्र येत असतात सद्गुरूंच्या भक्तीचे त्यांनी मोठे उदाहरण घडवले आहे. सद्गुरूनाथ त्यांना बळ देवो असा आशीर्वाद गोपाळ कृष्ण संस्थांचे प्रल्हाद महाराज यांनी दिला.