बीड दि.०९:डॉ गणेश ढवळे―
बुधवारी सायंकाळी पाणी आणण्यासाठी गेलेल्या उषा संदिप गिरे वय २९ वर्षे रा.गिरेवस्ती ,लिंबागणेश यांचा शेजारील शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.
दि. ०८/०७/२० वार बुधवार रोजी सायंकाळी ६ वा शेततळ्यावरुन पाणी घेऊन येते असे पती संदिप रमेश गिरे यांना सांगुन गेलेल्या उषा रात्री ८ पर्यंत घरी परतल्याच नाहीत, त्यानंतर शेजारी भावकी मध्ये विचारणा केली, पावसामुळे कदाचीत निवाऱ्यासाठी भावकितील कोणाच्या घरी थांबल्या असतील, परंतु कुठेच न सापडल्याने त्यांनी ईतरत्र शोधाशोध केली परंतु आढळुन आल्या नाहीत शेवटी त्यांनी शेतातळ्याकडे शोधाशोध केली तेव्हा शेततळ्यात त्यांना बुडालेल्या अवस्थेत दिसुन आल्या.त्यानंतर लिंबागणेश पोलिस चौकीतील कर्मचारी यांना कळवले ,त्यांनी स्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लिंबागणेश येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. आज सकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ.रकटे मडम यांनी सकाळी ९ वा.पोष्टमार्टमला सुरूवात केली आहे.
पोलिस तपास स.पो.नि. लक्ष्मण केंद्रे,नेकनुर ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबागणेश येथिल पोलिस कर्मचारी करत आहेत. उषा यांच्या पश्चात पती संदिप रमेश गिरे व दोन लहान मुले, सार्थक वय ७ वर्षे आणि संस्कार वय ४ वर्षे असा परीवार असुन त्यांचे माहेर गेवराई तालुक्यातील मौजे पिंपळा (कानडा) आहे.
–डॉ.गणेश ढवळे ,मो.नं.९४२००२७५७६