सोयगाव,दि.९:आठवडा विशेष टीम―
कोविड-१९ साठी ग्रामीण भागात आरोग्य,अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविका आदींचे कार्य कौतुकास्पद राहिले आहे.परंतु यापुढे आता म्र्यत्युदार रोखण्यासाठी सर्वांना एकजुटीने काम करावयाचे आहे.सोयगाव तालुक्याच्या बाजूलाच असलेल्या जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा विषाणू गंभीर आहे.त्यामुळे जळगावचा मृत्युदर जास्त असल्याने आता खरी कसोटी सोयगाव प्रशासनाची आहे.त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन तहसीलदार प्रवीण पांडे यांनी गुरुवारी कोरोना संसर्गाच्या एकदिवसीय कार्यशाळेत कर्मचाऱ्यांना केले.
सोयगावला पंचायत भुवन सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी कर्मचाऱ्यांना थर्मल गन आणि पल्स ऑक्सिमीटर हाताळण्याबाबत विशेष मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून दाखविले.यावेळी व्यासपीठावर सभापती रस्तुलबी पठान,तहसीलदार प्रवीण पांडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,तालुअक आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे,पंचायत समितीचे सदस्य संजीवन सोनवणे,बद्री राठोड,विस्तार अधिकारी केवलसिंग पाटील,आरोग्य विस्तार अधिकारी श्री गोरे,साहेबराव शेळके,आदींची उपस्थिती होती.नायब तहसीलदार मकसूद शेख यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले.तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.कार्यशाळेसाठी तालुक्यातील सरपंच,ग्रामसेवक,आशा कार्यकर्ती,अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,मदतनीस,पोलीस पाटील,आदींची उपस्थिती होती.
औरंगाबाद शहरात आजपासून लॉकडाऊन करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने दि.१० ते दि.१८ या कालावधीत जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातून सोयगाव तालुक्यात येणाऱ्या नागरिकांना रोखून त्यांची तातडीने आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा स्पष्ट सूचना या कार्यशाळेत देण्यात आली असून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तातडीने कारवाई करण्याचे अधिकार आता स्थानिक पातळीवर देण्यात आले असून विनामास्क भटकंती करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.