जरंडी,ता.९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जरंडीपासून जवळच असलेल्या घोसला ता.सोयगाव येथे कोट्यावधी रु.चा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्राची नूतन इमारत कोरोना संसर्गाच्या काळात धूळखात पडून उभी असून इमारतीला मात्र कोरोना संसर्गाची लागण झाल्याचा आभास ग्रामस्थांना होत असल्याने या इमारतीकडे ग्रामस्थही फिरकत नसल्याने कोट्यावधी रु निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या इमारतीचा सापळा उभा आहे.
घोसला आरोग्य उपकेंद्रातील सात गावांच्या नागरिकांना पारदर्शक आरोग्यसेवा मिळावी यासाठी सात वर्षापूर्वी आरोग्य विभागाने आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीला मंजुरी दिली होती.या इमारतीचे कामही हाती घेण्यात आले परंतु इमारतीच्या कामांना संबंधित ठेकेदाराने अपूर्णावस्थेत ठेवल्याने आरोग्य विभागाने या इमारतीचा ताबा न घेतल्याने अपूर्णवस्थेत असलेल्या या इमारतीचा आरोग्य विभाग ताबा अघेत नसून संबंधित ठेकेदारही या इमारतीचे अपूर्ण काम पूर्ण करत नसल्याने या इमारतीचा सापळा झाला आहे.इमारतीचे नवीन खिडक्या,तावदाने अज्ञातांनी फोडले असून इमारतीत दुर्गंधी पसरली आहे.इमारतीच्या आवारात व प्रभागात मोकाट कुत्र्यांचा मुक्तसंचार झालेला आहे.घोसलासह सात गावातील नागरिकांना आरोग्यसेवा मिळत नाही.त्यामुळे संबंधित आरोग्यसेविकेला काम करतांना इमारतीअभावी अडचणी निर्माण होत आहे.
————————
कोट्यावधी रु.चा निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या या इमारतीला अद्यापही आरोग्य उकेंद्राचे नावही देण्यात आलेले नसून इमारतीचे कामही अपूर्ण अवस्थेत असल्याने या इमारतीचा ताबा घेण्यास आरोग्य विभागाने नकार दर्शविला आहे.संबंधित ठेकेदाराने मात्र अद्यापही अपूर्ण काम पूर्ण करण्याची तसदी न घेतल्याने कोरोना संसर्गाच्या काळात गावातील यंत्रणांना काम करण्यासाठी अडचणी निर्माण होत असून ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पाठपुराव्यासाठी प्रशासनाला अपयश-
या इमारतीच्या कामाला वेग घेण्यासाठी पाठपुरावा करतांना तालुका प्रशासनाला अपयश आलेले असून दुर्गंधीच्या विळख्यात सापडलेल्या इमारतीत अज्ञातांनी तोडफोड करून या इमारतीचे खिडक्या व तावदाने पळवून नेली आहे.याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
चार खोल्या असलेल्या या भव्य उपकेंद्राच्या इम्रातीलाच कोरोनाची लागण झालेली असल्याचा प्रकार घोसला गावात पहावयास मिळत आहे.त्यामुळे या गावात रुग्णसेवा देतांना ऐन महामारीच्या काळात अडचणी निर्माण होत असल्याचे काही ग्रामाथांनी सांगितले.