सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
खरिपाच्या पिकांचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी आंतर मशागतीने पिकांचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी मजूर पुढे सरसावले असून यासाठी निंदनीच्या कामांनी वेग घेतला आहे.
सोयगावसह तालुक्यात पावसाने दडी मारल्याने आंतर मशागतीवर पिकांचे भवितव्य अवलंबून असल्याने पिकांची निंदनी करण्याच्या कामांनी सोयगाव तालुक्यात वेग घेतला आहे.त्यासाठी मात्र मजुरांची चणचण भासत आहे.
सोयगाव तालुक्यात खरिपाच्या ९५ टक्के पेरण्या आटोपल्या आहे.झालेल्या खरिपाच्या पिकांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.गायब झालेंल पावूस आणि खरिपाच्या पिकांमध्ये झालेले तणनियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मात्र धडपड करावी लागत आहे.पिकांमध्ये वाढलेले तण आणि त्यामुळे खुंटलेली वाढ यामुळे सोयगावचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे.या पिकांना सदृढ करण्यासाठी मजुरांच्या कडून निन्दनीच्या कामांनी वेग घेतला आहे.