बीड:आठवडा विशेष टीम― देशातील नव्हे तर संपूर्ण जगाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करणारे व घटनेच्या आधारे बहूजन वंचित छोट छोट्या जातील सामान्य माणसाला स्वाभिमानाने जगण्याचा न्याय मिळवून देणारे महामानव विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील इतिहासकालीन असलेल्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या जातीवादी समाजकंटकांना तात्काळ राज्याच्या गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करून शोधून त्यांच्यावर त्या समाजकंटकांवर तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यापुढे जर आमच्या अस्मितेवर घाला घालत असेल तर त्याला जशास तसे उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे पुढे दिलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले आहे की संबंध बहुजन समाजाच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना तात्काळ उत्तर देण्यास तयार आहोत या प्रश्ने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व महाराष्ट्र राज्याचे ग्रह मंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ या प्रश्नी त्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या व बहुजन समाजाच्या भावना दुखावणाऱ्या व राजगृहावर तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी संबंध वंचित सामान्य घटकातील सर्व समाज बांधवांना सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न कराल तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ असे देखील वाकसे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.