कानपूर /वृत्तसंस्था दि.१०:आठवडा विशेष टीम― कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड विकास दुबे चकमकीत मारला गेला असल्याचे वृत्त आहे. त्याला उत्तर प्रदेश UP Police पोलिस कानपूरला घेऊन आले. मात्र कानपूरमध्ये येताच पोलिसांची गाडी पलटी झाली. यावेळी विकास दुबेने एका पोलिसाची बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि कुख्यात गुन्हेगार विकास दुबेदरम्यान चकमक झाली. या चकमकीत विकास दुबेचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. कानपूरमधील भौती परिसरात ही घटना घडली. पोलिसांच्या फायरिंगमध्ये गंभीर जखमी झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेच्या कमरेत गोळी लागली होती. एक पोलिस देखील जखमी झाला होता. दोघांनाही जवळच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दुबेला मृत घोषित केले असल्याचे वृत्त सध्या आहे.
विकास दुबे हा खतरनाक, कुख्यात गुन्हेगार आहे. दुबेच्या विरोधात अनेक गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. त्यात खुन, अपहरण, खंडणी सारखी प्रकरनाचा देखील समावेश आहे. विकास दुबे याने २००१ मध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये घुसून तत्कालिक राज्यमंत्री शुक्ला यांची गोळी मारुन हत्या केली होती.