आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.२२ :हनुमंतखेडा ता.सोयगावला रविवारी(ता.२४) माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय आणि सेवा संकल्प जनकल्यान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता महाशिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ.सी.एम राव यांनी शुक्रवारी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख मार्गदर्शक राहणार असून प्रमुख उपस्थिती न्यायधीश एस.डी इंदलकर,सुनील साळवे(न्यायधीश सोयगाव),अध्यक्ष उमाकांत पाटील(उपाध्यक्ष मराठवाडा लीगल आणि एज्यूकेशन सोसायटी)लाभणार आहे.प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ.सी.एम राव,प्रसाद मिरकले,गणेश पवार,अड संतोष झाल्टे,प्रवीण पांडे(तहसीलदार सोयगाव), सुनील जाधव(अध्यक्ष वकील संघ औरंगाबाद)योगेश जावळे(तालुकाध्यक्ष वकील संघ सोयगाव)प्रकाश जोंधळे(गटविकास अधिकारी) आदींची उपस्थिती लाभणार आहे.कार्यक्रमाचे संयोजक प्रा.दिनेश कोलते(समन्वयक विधी साक्षरता शिबीर)राजेंद्र राठोड (अध्यक्ष जनकल्यान सेवा प्रतिष्ठान)यांनी विधी साक्षरता महाशिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.