औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणसोयगाव तालुका

सोयगावला भारतीय जनता पार्टीच्या विविध आघाड्या,मोर्चे कार्यकारिणी जाहीर

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडे पाटील―
सोयगाव तालुका भाजपच्या प्रमुख कार्यकारिणीसह विविध आघाड्या आणि मोर्चे यांच्या कार्यकारिणी शुक्रवारी झालेल्या तालुका भाजपच्या बैठकीत जाहीर करण्यात आल्या आहे.
तालुका भाजपची प्रमुख कार्यकारिणी पक्षाचे जेष्ठ्नेते वसंत बनकर यांनी जाहीर केली.यामध्ये तालुकाध्यक्षपदी गणेश लोखंडे यांना कायम करण्यात आले असून विनोद टिकारे,दादाराव झोंड,समाधान खैरनार,मोतीलाल वाघ,प्रतिभा पाटील,आत्माराम पवार,मनोज ठाकूर,चेतन जैन,संतोष वेल्हाळ,यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.विशाल चव्हाण,संभाजी पवार,समाधान सूर्यवंशी,विलास राठोड,या चौघांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.मुकुंदा गायकवाड,किशोर बावस्कर,योगेश देसले,समाधान आगे,नाना सोनार,अनिल चौधरी आदींची प्रमुख कार्यकारिणीत चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.विविध आघाड्यांमध्ये मीराताई चव्हाण,महिला आघाडी दिलीप पाटील किसान मोर्चा,पांडुरंग जाधव भटके विमुक्त,भीमराव बोराडे अनुसूचित जाती,कादिर शहा अल्पसंख्यांक,बाळू झवर व्यापारी आघाडी,मंगेश सोहनी ओ बी.सी मोर्चा,अॅड राजेश गिरी कायदा सेल,अनिल राठोड कामगार आघाडी,रवींद्र पाटील सहकार सेल,शरीफ तडवी आदिवासी मोर्चा,मयूर मनगटे सोशल मिडिया,आदींची विविध आघाड्यांच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.युवामोर्चा कार्यकारिणीत तालुकाध्यक्षपदी संजय चव्हाण,निखील चाटे,विशाल गिरी,राहुल रेकनोद,निलेश मगर,आरिफ शहा सत्तार शहा,गुरुदास पाटील,ईश्वर कोळपे,दीपक लव्हाळे आदींची उपह्याक्ष्पदी निवड करण्यात आली आहे.वरदान चव्हाण,हर्षवर्धन जगताप,ज्ञानेश्वर येळेकर यांची युवमोर्चाच्या सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे.संजय पवार,विशाल उबाळे,नितीन पाटील,सीताराम पाटील,कृष्णा धुमाळ,ललित वानखेडे,किशोर पाटील,दीपक मानकर,आदी युवा मोर्चाच्या चिटणीस पदी नियुक्त करण्यात आले आहे.युवा मोर्चाची कार्यकारिणी रऊफ देशमुख यांनी तर विविध आघाड्यांची कार्यकारिणी तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे यांनी जाहीर केली.केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्या आदेशानुसार या कार्यकारिणी जाहीर कार्न्त्यात आल्या असल्याचे बैठकीत सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.