बीड (प्रतिनिधी) : आज राज्य शासनाने १८ वरिष्ठ सनदी अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. अकोल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अस्तिक कुमार पांडे यांची बीडच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे तर बीडचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांची माहिती आणि तंत्रज्ञान येथे संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. अस्तिक कुमार पांडे हे २०११ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. अकोला येथे कार्यरत असताना त्यांनी शेतकर्यांसाठी अनेक योजना राबविल्या होत्या. सोबतच स्वच्छता अभियानातही त्यांनी स्वतः सहभागी होऊन कार्य केलेले आहे. त्यांच्या जागी अकोला येथे जिल्हाधिकारी म्हणून जे.एस. पापळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पापळकर हे सध्या चंद्रपूर येथील जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन कार्यरत होते.