बीड जिल्हामहाराष्ट्र राज्य

खादी ग्रामोद्योगच्या महत्वपूर्ण योजनांचा कुंभार बांधवांनी लाभ घ्यावा - तडसकर उत्तरेश्वर

आठवडा विशेष|प्रतिनिधी

बीड दि.२३: खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने व बीड जिल्हा कुंभार समाज संघटनेच्या सहकार्याने जिल्हाभरातून कुंभार समाातील आकराशे लोकांना माती कला उद्योजक माती कलेचे मोफत प्रशिक्षणाचे उद्दीष्ट असून प्रशिक्षणानंतर लगेचच प्रशिक्षीत बांधवांना सवलतीत विजेवर चालणारे आधुनिक चाक व 20 जणांच्या गट समुहाला एक माती मळणी यंत्र खादी व ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने देण्यात येणार असल्याची माहिती बीड जिल्हा कुंभार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष तडसकर उत्तरेश्वर यांनी दिली आहे.

जिल्हाभरात मागासलेल्या कुंभार उद्योगामध्ये आधुनिकता येण्यासाठी व क्षमतावृध्दी वाढविण्यासाठी केंद्र शासनाने ‘केव्हीआयसी’ च्या माध्यमातून कुंभार बांधवांना कुंभार उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा संघटनेच्यावतीने आकराशे उद्योजकांचे उद्दीष्ट समोर ठेवून त्यांना आधुनिक उपकरणे मिळवून देण्यासाठी महत्वाचे पाऊल उचललेले आहे. तरी संबंधीत समाज बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, दोन पासपोर्ट फोटो, स्वत:चा पूर्ण बायोडाटा मोबाईल क्रमांकासह पुढील पदाधिकार्‍यांकडे जमा करावा. - जालींदर करडकर .मनोह आबा ईटकर (मो.9921699519), उत्तरेश्वर तडसकर (मो.7775041285), हनुमान चित्रे (मो.9767489309), बळीराम करडकर (मो.9960401052),रमेश जाधव - मो.9545299970,आकाश राऊत - मो.9604101449,संतोष गोरे मो.9172505959, बबन आवंतकर मो.9403265737,दत्ता बावनकर मो. 9420429552,तानाजी विटेकर मो.9890369903,रावसाहेब देशमुख मो.9970391919,अशोक राऊत मो.9075515515, औधुत करडकर मो.9765518379,बाबासाहेब चौघुले मो.9657730856, जीवनराव देवतरसे मो.9764341107 या पदाधिकार्‍यांकडे चार दिवसाच्या आत आपले कागदपत्रे जमा करावेत असे आवाहन कुंभार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे यांनी केले आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.